
kangana ranaut statement : शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने (SGPC) मंगळवारी अभिनेत्री व खासदार कंगना राणौतच्या आगामी ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. चित्रपटातून शिखांची बदनामी केल्या प्रकरणी व चुकीच्या पद्धतीने इतिहासाची मांडणी केल्या प्रकरणी त्यांनी नोटिस पाठवली आहे. कंगनाने कट्टरपंथी शीख धर्मोपदेशक जर्नेल सिंग भिंद्रनवाले व शीख समुदायातील इतर कोणत्याही व्यक्तीने कधीही खलिस्तानची मागणी केलेली नाही, असं देखील वक्तव्य केलं आहे. इमर्जन्सी हा चित्रपट माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर व १९७५ मध्ये भारतात आणीबाणी लागू करण्यात आली होती, त्यावर आधारित हा चित्रपट आहे.