Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Dahihandi 2024 : दहीहंडीच्या उत्सवाला गालबोट! मुंबईत थरावरुन कोसळून १०६ गोविंदा...

Mumbai Dahihandi 2024 : दहीहंडीच्या उत्सवाला गालबोट! मुंबईत थरावरुन कोसळून १०६ गोविंदा जखमी, रुग्णालयात दाखल

[ad_1]

Dahihandi 2024 mumbai : मुंबईत दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. साऊंड सिस्टिम, लेझर शो, डॉल्बीचा दणदणाट, लावण्यांचा कार्यक्रम तसेच बॉलीवूड  कलाकारांच्या उपस्थितीमुळे सर्वत्र  उत्साहाला उधाण आले आहे. दरम्यान या उत्साहाला गालबोट लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. थरावरून कोसळल्याने काही गोविंदा जखमी झाले आहेत. मुंबईत रात्री ९ वाजेपर्यंत १०६  गोविंदा जखमी झाल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. यापैकी १५ गोविंदावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. १७  जणांवर ओपीडीमध्ये  उपचार सुरू आहेत. तर ७४ जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. ही आकडेवारी मुंबई महापालिकेने दिली असून रात्री ९  वाजेपर्यंतची आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत जखमी गोविंदांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments