
Vasant Chavan Death: काँग्रेस ज्येष्ठ नेते आणि नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंत चव्हाण यांचे आज (२६ ऑगस्ट २०२४) निधन झाले आहे. वयाच्या ६४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वसंत चव्हाण हे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असून त्यांच्यावर हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मध्यरात्री त्यांची तब्येत बिघडली आणि आज पहाटे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वसंत चव्हाण यांच्या निधनाने नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.