
‘बिग बॉस मराठी’च्या कालच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊने जान्हवीची चांगलीच हजेरी घेतली. तसेच भाऊच्या धक्क्यावर स्थान न देता तिला जेलची शिक्षादेखील सुनावली. आता आजचा भाऊच्या धक्क्यावर काय होणार याकडे सर्वांचच लक्ष लागले आहे. कोणता सदस्य घराबाहेर जाणार याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. अशाकत आज भाऊच्या धक्क्यावर सदस्य निर्भीड दुर्गाच्या निडर प्रश्नांना सामोरे जाताना दिसून येणार आहेत.








