Monday, September 14, 2026
Homeसातारादहा वर्षाच्या बालिकेचे अपहरण व अत्याचार करून खून ; दोन आरोपी अटक

दहा वर्षाच्या बालिकेचे अपहरण व अत्याचार करून खून ; दोन आरोपी अटक

कोल्हापूर: शिये (ता. करवीर) गावात मोलमजुरी करणाऱ्या परप्रांतीय कुटुंबातील दहा वर्षांच्या बालिकेचे अपहरण करून उसाच्या शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला आणि त्यानंतर गळा दाबून खून करण्यात आला. गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी तपास करून जवळचा नातेवाईक दिनेशकुमार केशनाथ साह (२५, रा. बिहार) यास अटक केली आहे. त याने पीडितेवर अत्याचार केल्यानंतर गळा दाबून खून केल्याची कबुली दिली. या घटनेने राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पाच डॉक्टरांच्या पथकाने मुलीच्या मृतदेहाची इन कॅमेरा उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला

राबवली. संपूर्ण परिसर पिंजून काढला. तरुणांनी हातात बॅटरी, मोबाईलची लाईट लावून शोध घेतला; पण मुलीचा शोध लागला नाही.रात्री साडेनऊ वाजता शिरोली एमआयडीसी पोलिसांना नागरिकांनी फोन करून सहा वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती दिली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी हातडीने परिसरात दाखल झाले. बेपत्ता मुलीच्या बाहेवाईकांशी चर्चा करून मिसिंग दाखल केले. त्यानंतर रात्री एक वाजेपर्यंत पोलीस शोध घेत होते. मोठ्या बॅटरी आणून पोलिसांनी शोध चेकला; पण मुलगी सापडली नाही. करवीरचे पोलीस उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह पथकाने भेट देऊन चौकशी सुरू केली.

दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळपासून शोध सुरू झाला. कोल्हापुरातून श्वान पथकास पाचारण केले. श्वानाला बेपत्ता मुलीच्या कपड्यांचा वास देण्यात आला. त्यानंतर हे श्वान मुलीच्या घरापासून दक्षिणेला उसाच्या शेतात गेले. हरदासकीचा ओढा परिसरात बेपत्ता मुलीचा मृतदेह आढळून आला. तिच्या अंगावर केवळ फ्रॉक होता. अंतर्वस्त्रे व चप्पल तेथून थोड्या अंतरावर उसाच्या सरीत पडली होती. यावरून तिच्यावर अत्याचार करून खून केल्याचे स्पष्ट होत होते. दरम्यान, पोलिसांनी या परिसरातील सहा ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये संशयित आरोपी दिनेशकुमार साह हा पीडित मुलीस उसाच्या शेतात नेत असल्याचे दिसून आले.

या गंभीर घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, करवीरचे उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर, एलसीबीचे निरीक्षक कळमकर यांच्यासह फॉरेन्सिक लॅब, ठसेतज्ज्ञांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आला.अंगावर ओरखडे, डोळा बाहेर : पीडित मुलीशी उराधमाने झटापट केली, ती तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत असताना तिला मारहाण झाल्याच्या खुणा आहेत. मुलीच्या दोन्ही दंडांवर, गळ्यावर नखाचे ओरखडे आहेत. यावरून निर्दयीपणे तिच्यावर अत्याचार केल्यानंतर गळा दाबून खुन केल्याचे दिसते. यावेळी मुलीचा एक डोळा थौडा बाहेर आला होता.

इन कॅमेरा शवविच्छेदन: अत्याचारग्रस्त मृत मुलीचा मृतदेह गुरुवारी दुपारी तीन वाजता सीपीआर रुग्णालयात आणला. तेथे पाच डॉक्टरांचे पथक, फॉरेन्सिक लॅबची टीम यांच्या उपस्थितीत इन कॅमेरा उत्तरीय तपासणी

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments