Tuesday, September 22, 2026
HomeमनोरंजनKolkata Case : देशात चाललंय काय? कोलकाता प्रकरणावर पोस्ट लिहिणाऱ्या अभिनेत्रीला बलात्काराच्या...

Kolkata Case : देशात चाललंय काय? कोलकाता प्रकरणावर पोस्ट लिहिणाऱ्या अभिनेत्रीला बलात्काराच्या धमक्या

[ad_1]

Mimi Chakraborty On Kolkata Case: कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे देशभरातील लोकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळेच न्यायाची मागणी करत आहेत आणि आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करत आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसची माजी खासदार मिमी चक्रवर्ती हिने मंगळवारी कोलकाता बलात्कार प्रकरणासंदर्भात एक पोस्ट शेअर केली होती. तिची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच, आता अभिनेत्रीला बलात्काराच्या धमक्या मिळू लागल्या. याशिवाय तिच्या फोनवर सतत अश्लील मेसेज येऊ लागले आहेत. मिमी चक्रवर्तीने यासंदर्भात कोलकाता पोलिसांना माहिती दिली आहे. पोलिसांच्या सायबर सेल विभागालाही टॅग केले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments