Sunday, August 30, 2026
Homeब्लॉगऑम्फोरा हे मातीने तयार केले गेलेले एक रोम भांडे असून मोठ्या प्रमाणावर...

ऑम्फोरा हे मातीने तयार केले गेलेले एक रोम भांडे असून मोठ्या प्रमाणावर याची खापरे महाराष्ट्रात ठिक ठिकाणी उत्खननातून उपलब्ध झाली आहेत,

फलटणः ऑम्फोरा हे मातीने तयार केले गेलेले एक रोम भांडे असून मोठ्या प्रमाणावर याची खापरे महाराष्ट्रात ठिक ठिकाणी उत्खननातून उपलब्ध झाली आहेत, इ स पु पहिल्या शतकापासून रोम आणि सातवाहन यांच्यत मोठ्या प्रमाणावर व्यापार चालत असे भरूच, सोपारा कल्याण त्या काळातील प्रमुख बंदरे , या बंदरातून व्यापार झाल्याच्या नोंदी स्ट्रॅबो प्लिनी आणि इतर पाश्चिमात्य विचारवंतांनी नोंदवून ठेवलेली आहेत, सातवाहनाच्या बरोबर चाललेल्या मोठ्या प्रमाणावर व्यापार चालत असल्याने स्ट्रॅबो यांनी सिनेटमध्ये भिती व्यक्त केली होती.
रोमच्या बरोबर चालत असलेल्या व्यापारामुळे रोमन लोकांना इथे वसाहत करून राहवे लागत होते तशी नाणी आणि वसाहतींचे अवशेष आढळून आलेली आहेत.
ऑम्फोरा हे एक वैशिष्ट्यपूर्ण भांडं असून मद्यकुंभ म्हणून याचा जास्त वापर होत होता जवळपास चार फूट उंचीचा निमुळत्या बुडाचे माने जवळ दोन्ही बाजूंनी मुठी असलेला आणि गोल तोंडाचा असे या कुंभाचे स्वरूप.
तेर (थेर) व पैठण या ठिकाणी याची खापरे मिळाली आहेत तर तेर इथे रोमन कुंभारांच्या वस्ती स्थाळाचे अवशेष उत्खननात मिळाली असून महाराष्ट्रातून रोमच्या बरोबर आपला व्यापार किती मोठ्या प्रमाणावर चालत होता याचा अंदाज आपण बांधू शकतो सातवाहन काळात स्थैर्यता निर्माण झाल्याने महाराष्ट्रने सुवर्ण काळ अनुभवले असणार असे आपण म्हणू शकतो…!

सूरज रतन जगताप

लेणी अभ्यासक

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments