Friday, September 25, 2026
HomeमनोरंजनJacqueline Fernandez: जॅकलिन फर्नांडिसच्या प्रेमात आंधळा झाला सुकेश चंद्रशेखर; वाढदिवशी दिली यॉट,...

Jacqueline Fernandez: जॅकलिन फर्नांडिसच्या प्रेमात आंधळा झाला सुकेश चंद्रशेखर; वाढदिवशी दिली यॉट, १०० आयफोन अन् ३०० घरं!

[ad_1]

Jacqueline Fernandez: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा ११ ऑगस्ट रोजी वाढदिवस होता. या खास प्रसंगी दिल्लीतील तुरुंगात बंद असलेल्या ठग सुकेश चंद्रशेखरने आपली तिजोरी उघडली आहे. त्याने अभिनेत्रीच्या नावाने एक पत्र लिहिले आहे, ज्यामध्ये त्याने तिला देत असलेल्या वाढदिवसाच्या भेटवस्तूंचा उल्लेख केला आहे. या यादीमध्ये खाजगी यॉटपासून ते चाहत्यांसाठी १०० आयफोन, वायनाड, केरळमधील भूस्खलनग्रस्तांसाठी १५ कोटी रुपयांची देणगी आणि ३०० घरे बांधण्याचे आश्वासन यांचा समावेश आहे. सुकेश चंद्रशेखर याने जॅकलिन फर्नांडिसला लिहिलेल्या पत्रात तिच्या वाढदिवशी अभिनेत्रीवरचे प्रेम व्यक्त केले आहे. तिला ‘माझी बेबी, माय बम्मा’ म्हणत सुकेशने जॅकलिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विभक्त असूनही आपले विचार आणि आत्मा एकमेकांशी जोडलेले असल्याचे त्याने या पत्रात म्हटले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments