
या घटनेचा व्हिडिओ शेअर करताना सुषमा अंधारे यांनी कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, ‘भाजपचा स्थानिक पुढारी आणि बुलढाण्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती शिवा तायडे या गावगुंडाकडून शहरातील पोलीस स्टेशन मध्येच महिलेला मारहाण, थोर ते गृहमंत्री…थोर ते पोलीस कर्मचारी.’ सुषमा अंधारे यांनी हा व्हिडिओ शेअर करताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, सुप्रिया सुळे, यशोमती ठाकूर, आदित्य ठाकरे आणि शिवसेना यूटीबी यांनाही टॅग केले आहे.





