Monday, September 14, 2026
Homeदेश-विदेशपती सतत Sick Leave घेऊन..; इन्स्पेक्टरला महिलेबरोबर नको त्या अवस्थेत पकडणाऱ्या पत्नीचा...

पती सतत Sick Leave घेऊन..; इन्स्पेक्टरला महिलेबरोबर नको त्या अवस्थेत पकडणाऱ्या पत्नीचा खुलासा

[ad_1]

Police Inspector Caught With Lover By Wife Video: आग्रा येथील रकाबगंज पोलीस स्टेशन सध्या भारतभरामध्ये चर्चेत आहे. या चर्चेचं कारण ठरत आहे येथील एका महिला आणि पुरुष इन्स्पेक्टरचं प्रेमप्रकरण. पुरुष इन्स्पेक्टरच्या पत्नीने त्याला त्याच्या कथित प्रेयसीबरोबर रंगेहाथ पकडल्यानंतर पोलीस कॉलिनीमध्ये झालेल्या राड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मागील दोन दिवसांपासून व्हायरल होत असून आता या प्रकरणामध्ये पोलीस खात्याने मोठी कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे. तसेच पत्नीने तब्बल 300 किलोमीटर प्रवास करुन येत पतीला रंगेहाथ पकडण्यामागील मूळ कारण काय ठरलं याबद्दलचाही खुलासा केला आहे.

नेमकं घडलं काय?

पोलीस निरिक्षक असलेल्या शैली राणाच्या घरी गेल्याची माहिती इन्स्पेक्टर पवन नागर यांच्या पत्नीला पोलीस स्टेशनमधील कोणीतरी दिली. त्यानंतर गीता नागर त्यांचा भाऊ, वहिनी, मुलगा, भाच्यासहीत या पोलीस कॉलिनीमध्ये दाखल झाल्या. त्यानंतर त्यांनी शैला राणा यांची रुम गाठली असता तिथे पती पवन आणि शैली नको त्या अवस्थेत आढळून आले. यानंतर या दोघांनाही गीता आणि त्यांच्याबरोबर आलेल्या नातेवाईकांनी मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ सहकाऱ्यांनी शूट करुन व्हायरल केला.

पत्नीला शंका कशी आली?

पवन नागर यांची नियुक्ती मुजफ्फर नगरमध्ये होती. मात्र त्यांची बदली विजलेन्स विभागामध्ये झाली होती. आपली बदली रोखण्यासाठी पवन आजारपणाची सुटी म्हणजेच सीक लिव्ह घेऊन इकडे-तिकडे भटकत वेळ काढत होते. गीता नागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवऱ्याच्या या वागण्याची शंका आल्याने त्यांनी चौकशी सुरु केली. तेव्हा बदली थांबवण्यासाठी नाही तर प्रेयसीला भेटण्यासाठी पती दुसऱ्या शहरांमध्ये जायचा असं गीता यांना समजलं. त्यानंतर गीता यांनी माहिती काढून पती शैला राणा या महिला इन्स्पेक्टरला भेटायला जात असल्याचं समजल्यानंतर ट्रॅप रचला आणि त्या जाळ्यात त्यांचा पती अडकला.

कुठे झाली भेट?

काही काळापूर्वी इन्स्पेक्टर पवन नागर आणि इन्स्पेक्टर शैली राणा या दोघांची नियुक्ती एकाच ठिकाणी म्हणजे नोएडामध्ये होती. तिथेच या दोघांची भेट झाली आणि भेटीचं रुपांतर मैत्रीत आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. नोएडामध्ये एकत्र काम करताना शैली आणि पवन यांच्यामधील जवळीक वाढली. ते सातत्याने एकमेकांच्या संपर्कात होते. नंतर शैली यांची आग्रा येथे बदली झाली. 

पोलिसांनी केली मोठी कारवाई

गीता यांना याच शैली नावाच्या महिलेबरोबर पतीचे विवाहबाह्य प्रेमसंबंध असल्याचं समजलं. गीता यांनी नातेवाईकांबरोबर नवऱ्याला त्याच्या प्रेयसीबरोबर रंगेहाथ पकडल्यानंतर या साऱ्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. दोन्ही इन्स्पेक्टरला मारहाण होत असल्याच्या या व्हिडीओमुळे पोलीस खात्याची बदनामी झाल्याने पोलीस कमिश्नर जे. रविंद्रर गौड यांनी शैली यांना निलंबित केलं आहे. कोणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही, असंही गौड म्हणाले. त्यांनी दोन्ही इन्स्पेक्टरला मारहाण करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments