Monday, August 17, 2026
Homeब्लॉगबुध्दांची पहिली मुर्ती बनवून घेणारा बुध्द धम्म अनुयायी राजे कनिष्क".

बुध्दांची पहिली मुर्ती बनवून घेणारा बुध्द धम्म अनुयायी राजे कनिष्क”.

फलटणः इ स ७८ च्या सुमारास उतेरेस कुषाण वंशीय “बुध्द धम्म अनुयायी कनिष्क” होऊन गेले, त्यांनी गादीवर बसताच अनेक धम्माला पूरक अशा गोष्टी केल्या, कनिष्क यांच्या आधी बुध्द प्रतिक म्हणून हत्ती, धम्म चक्र, बौद्धी वृक्ष, खाली आसन, त्रिरत्न, पद्चिन्ह , स्तूप आदी थेरवादा प्रमाणे पुजल्या जात होत्या, ह्या काळा पर्यंत महायान पंथाचा उदय झालेला नव्हता, मूर्ति पुजा अजून अस्तित्वात नव्हती, कनिष्क गादीवर बसल्यानंतर त्यांनी चौथी धम्म संगीत भरवली याच संगीती मध्ये “महायान” पंथाचा उदय झाला व इथूनच खर्या अर्थाने मूर्ती पुजेला प्रारंभ झाला.
महायान पंथाने मूर्ती पूजेचा स्वीकार केला.

या आधी मिलिंद राजे यांनी आपल्या नाण्यांवर “धम्म चक्र” अंकित करून घेतले होते. तर ‘कदाफिस कुष्णाने सत्य धर्माचा अनुयायी म्हणजे बौध्द धम्माचा अनुयायी’ हा लेख आपल्या नाण्यावर कोरून घेतला होता.

कनिष्क यांच्या काळात धम्माला व महायान पंथाला पूरक असे वातावरण तयार झाले होते , कनिष्क यांनी सर्वात आधी आपल्या नाण्यावर तथागत गौतम बुद्धांच्या प्रतिमेचे मानवी रूपात अंकन केले व ग्रीक भाषेत “बोडो” (BODDO) हा लेख लिहिला. या वेळे पासून हीनयान (थेरवाद) पंथातील प्रतीक पुजा मागे पडली व मुर्ती पुजेला प्रारंभ झाला, कुषाण काळात मथुरा हे प्रमुख कला केंद्र होते या केंद्रात बनविलेल्या काही मूर्त्या “विदर्भात” उत्खनन करतांना सापडल्या आहेत.
महत्त्वाचे म्हणजे आजपर्यंत मिळालेल्या बुध्द मूर्तीमध्ये एकही कनिष्काच्या काळापूर्वीच्या नाही.
बुध्दांची पहीली मुर्ती ही त्यांच्या महापरिनिर्वाणाच्या ५०० वर्षा नंतर घडवली गेली व ती कनिष्क यांच्या राज दरबारी असलेल्या कलाकाराने घडवली त्याचे नाव “Angelo’s” असे होते, जी पहीली मुर्ती बनवून घेतली गेली ती अस्सल सोन्याची होती.

सूरज रतन जगताप

लेणी अभ्यासक

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments