
राज्यात हिट अँड रनच्या घटना वाढल्याचे दिसून येत आहे. पुणे, नागपूर, नाशिक व मुंबईनंतर आता अकोल्यातही अशी घटना घडली आहे. अकोला जिल्ह्यातील कुरणखेड येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका पोलीस उपनिरिक्षकाला (PSI) भरधाव कारनं उडवलं. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.