Sunday, September 20, 2026
Homeसाताराफलटण वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. बापूसाहेब सरक; उपाध्यक्षपदी ॲड. मयुरी शहा

फलटण वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. बापूसाहेब सरक; उपाध्यक्षपदी ॲड. मयुरी शहा

फलटण : वकील संघाच्या सन २०२४-२५ वर्षीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ॲड. बापूसाहेब बाबासाहेब सरक तर उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ॲड. मयुरी चैतन्य शहा या विजयी झाल्या तर उर्वरित पदाधिकाऱ्यांच्या निवडी या बिनविरोध करण्यात आल्या. विजयी उमेदवारांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

फलटण वकील संघाच्या सन २०२४-२५ यावर्षीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत ॲड. बापूसाहेब सरक व ॲड . अभिजीत यादव हे उमेदवार निवडणुक रिंगणात होते. दोघांमध्ये झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत ॲड . बापूसाहेब सरक हे विजयी झाले. तर ॲड. मयुरी शहा व ॲड. मेघा अहिवळे या उपाध्यक्ष पदासाठी निवडणुक रिंगणात होत्या. त्यामध्ये ॲड. मयुरी शहा या विजयी झाल्या. तर सचिव ॲड. सुरज सोनवलकर, खजिनदार ॲड. प्रशांत साठे, सहसचिव ॲड. विशाल मोहिते, सदस्य ॲड. अनिल कुंभार व ॲड. मयूर भोसले या पदाधिकाऱ्यांच्या निवडी या बिनविरोध करण्यात आल्या.

फलटण वकील संघाच्या निवडणुकीमध्ये निवडणुक निर्वाचन अधिकारी म्हणुन ॲड. आर.ए. यादव ॲड. गणेश तावरे व ॲड. राहुल सतुटे यांनी कामकाज पाहिले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments