Pune Rain Update : पुण्यात पावसाचा जोर ओसरला, पण पूरग्रस्तांचे हाल सुरूच; २४ तासांपासून वीज, पाणी गायब

0
22
Pune Rain Update : पुण्यात पावसाचा जोर ओसरला, पण पूरग्रस्तांचे हाल सुरूच; २४ तासांपासून वीज, पाणी गायब

पुण्यात काल एकतानगर, सिंहगड रोड, संगम परिसर, शिवाजीनगर, हॅरीस ब्रिज शांतीनगर झोपडपट्टी, दांडेकर पूल दत्तवाडी आणि विश्रांतवाडी येथे अनेक घरात पावसाचे पाणी शिरले होते. अग्निशामक दल आणि एनडीआरएफच्या पथकाने या ठिकाणी बचाव कार्य राबवले. येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. आज पाणी ओसारल्याने काही नागरिक घरी परतले आहे. पाण्यात वाहून गेलेल्या संसारांमुळे ते हतबल झाले आहेत.

Source link