Tuesday, September 15, 2026
Homeसाताराऐतिहासिक वाघनखे अखेर लंडनहून साताऱ्यात दाखल ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते...

ऐतिहासिक वाघनखे अखेर लंडनहून साताऱ्यात दाखल ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

फलटण : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील म्हणजेच शिवकालीन वाघनखे बुधवारी साताऱ्यात दाखल झाली. छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालयात ही वाखनखे ठेवण्यात आली असून, जिल्हा प्रशासनाकडून सुरक्षेची पुरेपूर खबरदारी घेण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमध्ये असलेली ही वाघनखे बुधवारी सकाळी विशेष विमानाने महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत दाखल झाली. सर्वसोपस्कार पूर्ण झाल्यानंतर कडेकोट पोलिस बंदोबस्तात या वाघनखांचा स्वराज्याची चौथी राजधानी असलेल्या साताऱ्याच्या दिशेने प्रवास सुरु झाला. एका टेम्पोतून ही वाघनखे साताऱ्यातील वस्तु संग्रहालयात सुरक्षित आणण्यात आली. या वाघनखांसह ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ या शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे शुक्रवारी (दि. 19) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन केले जाणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

शनिवारपासून (दि. 20) हे प्रदर्शन सर्व नागरिकांना पाहण्यासाठी खुले करण्यात येणार आहे. वाघनखे सात महिने सातारा येथील संग्रहालयात सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत नागरिकांना पाहण्यासाठी खुले राहील. याची तिकिटे ऑनलाईन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने नागरिकांना उपलब्ध करून घेता येतील. हे प्रदर्शन एकावेळी दोनशे लोकांना पाहता येतील येईल. दिवसभरातून यासाठी चार स्लॉट उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. यामध्ये पहिला स्लॉट विद्यार्थ्यांसाठी मोफत राहणार आहे. तर दुपारी एकनंतर सर्व स्लॉट नागरिकांना नाममात्र शुल्क आकारून पाहण्यासाठी उपलब्ध राहणार आहे. या प्रदर्शनाचा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे

नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

ऐतिहासिक वाघनखे हे प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण असणार आहे. त्याचबरोबरच नागरिकांना शिवकालीन शस्त्र, वस्त्र, नाणी, तलवारी, बंदुका, भाल्यांचे विविध प्रकार, पट्टे, कुऱ्हाडी, कट्यारी, बाण, गदा यासह इतर दुर्मिळ वस्तू पहावयास मिळणार आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments