फलटण:- तहसील कार्यालय फलटण अंतर्गत तहसीलदार अभिजित जाधव, निवासी नायब तहसीलदार व नायब तहसीलदार लिपिक व अव्वल लिपिक निलेश भोसले, लिपिक प्रशांत शिंदे यांच्यावर कारवाई करणेबाबत व रेकॉर्ड विभागातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांनी उपविभागीय अधिकारी सचिन डोले यांच्याकडे निवेदन दिले आहे. सदर निवेदनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तहसील कार्यालयात होणाऱ्या बेकायदेशीर कामाची पोलखोल केली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटना सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांनी उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्याकडे दिलेल्या निवेदनात असे म्हंटले आहे की, फलटण तालुक्यातील शेती महामंडळ वर्ग २ जमिनी वर्ग १ करण्यासाठी ४ फेब्रुवारी २०२४ रोजी शासनाने आदेश काढले असून तहसील कार्यालय फलटण येथील महसूल अव्वल कारकून निलेश भोसले याने ऋषी भोसले सांगवी कोतवाल व साखरवाडी येथील तलाठी कार्यालयात काम करणाऱ्या खाजगी कर्मचारी शाम भोसले यांना हाताशी धरून शेतक-याना २० हजार ते २५ हजार रुपये प्रति एकरी मागणी करत आहेत. निलेश भोसले व शाम भोसले यांनी शेतकऱ्यांना विविध कामातून आर्थिक पैशाची मागणी करत शेतकऱ्यांना विनाकरण त्रास देत मोठी बेहिशोबी मालमत्ता कमवली आहे. जे शेतकरी शेती महामंडळाचे प्रकरणे थेट तहसील कार्यालयात जमा करतात त्यांना निलेश भोसले अडवणूक करत सतत विविध कारणे देत शेतकऱ्यांना त्रास देत आहे. शेती महामंडळाच्या जमिनी वर्ग १ साठी दाखल झालेल्या सर्व प्रकरणाच्या अर्जदार शेतकरी यांच्याकडून कोणी कोणी व किती पैसे मागणी करून स्वीकारले. कोणत्या वरिष्ठ अधिका-याना आर्थिक हिस्सा मिळाला याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभाग यांना महसूल विभागाने चौकशी करावी, महसूल अव्वल कारकून निलेश भोसले व साखरवाडी येथील तलाठी कार्यालयात काम करणाऱ्या खाजगी कर्मचारी शाम भोसले यानी सेवा कालावधीत पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून अपसंपदा कमवली असून त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १६८८ कलम १३ (१) (ई) सह १३ (२) व भ्रष्टाचार प्रतिबंधक सुधारित अधिनियम २०१८ कलम १३(१) (ई) सह १३ (२) नुसार चौकशी करुण कारवाई करावी.
तहसील कार्यालयातील विविध विभागातील सर्व लिपिक व अव्वल लिपिक यांनी तहसीलदार अभिजित जाधव, निवासी नायब तहसीलदार व नायब तहसीलदार यांना हाताशी धरून अनेक खाजगी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली खाजगी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली कोणाच्या परवानगीने केली त्यांना पगार कोण, किती व कुठून दिला जातो याची चौकशी करावी. नेमणूक करणाऱ्या विविध विभागातील लिपिक व अब्बल लिपिक यांची तसेच तहसीलदार, निवासी नायब तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्यावर चौकशी व्हावी व संबंधितांवर कारवाई करण्यात यावी. तत्काळ तहसील कार्यालयात काम करणाऱ्या खाजगी कर्मचाऱ्यांना काढण्यात यावे, निलेश भोसले अव्वल लिपिक, प्रशांत शिंदे लिपिक याचा सहभाग असून त्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे असे म्हंटले आहे.
फलटण तालुक्यातील अनेक तलाठी कार्यालयातील कोतवाल याना नेमून दिलेल्या कामात परस्पर बदल करून किश खराडे, तडवळे कोतवाल, ऋषी भोसले सांगवी कोतवाल, विजय एकळ दूधेवावी कोतवाल, बधा ढावरे पाडेगाव कोतवाल, गुरव मुंजवडी कोतवाल, गोरे निरगुडी कोतवाल, गोपी जगताप फडतरवाडी कोतवाल, भीमराव चव्हाण राजुरी निवृत्त कोतवाल, सागर काकडे वाजगी कर्मचारी यांची नेमणूक फलटण तहसील कार्यालयातील रेकॉर्ड विभागात करण्यात आली असून त्यांना रेकॉर्ड विभागातील काम देण्यात आले आहे. रेकॉर्ड विभागात काम करणा-या कोतवाल व खाजगी कर्मचारी यांनी अनेक अर्जदार यांच्याकडून फोन पे व गूगल पे ने बेकायदेशीर रक्कम स्वीकारले असून रेकॉर्ड विभागात काम करणा-या कोतवाल व खाजगी कर्मचारी यांचे बैंक खाते तसेच फोन पे व गूगल पे लाच लुचपत विभाग यांनी तपासणी करावी अवेध रक्कम स्विकारल्या प्रकरणी कारवाई करावी, सर्व शासकीय कोतवालांना त्यांच्या नेमणुकीच्या तलाठी कार्यालयात रुजू करण्याचे आदेश व्हावे कोतवाल नेमणूक प्रकरणी तत्काळ चौकशी करण्यात यावी.
स्वाभिमानी शेतकरी संघटना सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांनी खाजगी कोतवाल नियुक्ती, तहसील कार्यालयातील खाजगी कर्मचारी नियुक्ती, रेकॉर्ड विभागातील भ्रष्टाचार, शेती महामंडळाच्या जमिनीच्या वर्ग १ ची परवानगीतील भ्रष्टाचार याबाबत आक्रमक पवित्रा घेतला असल्याने तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे तक्रारी येण्यास सुरुवात झाली आहे.
अधिकाराचा गैरवापर करून अपसंपदा कमवल्ली असून त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १६८८ कलम १३ (१) (ई) सह १३ (२) व भ्रष्टाचार प्रतिबंधक सुधारित अधिनियम २०१८ कलम १३ (१) (ई) सह १३ (२) नुसार चौकशी करुण कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय सातारा क्रमांक-मह / कु. का/बतन/ कवि-१००६/२०२१ दिनांक २३/११/२०२१ उपजिल्हाधिकारी सातारा यांनी आदेश देऊनही तहसीलदार कार्यालय फलटण येथील कोतवाल यांना मुक्त करण्यात आले नाही. उपजिल्हाधिकारी सातारा यांच्या आदेशाचे पालन न केल्या प्रकरणी जबाबदार तहसीलदार अभिजित जाधव यांच्यावर कारवाई करण्यात यावी असेही म्हंटले आहे.
फलटण तालुक्यातील अनेक तलाठी व मंडल अधिकारी कार्यालयात शासकीय कोतवाल असताना अनेक स्वाजगी कर्मचारी कोतवाल म्हणून काम करत असून संगणक काम करणे, सातबारा देणे, दाखला देणे ही कामे खाजगी कर्मचारी कोतवाल करत आहेत यापुढे फलटण तालुक्यातील तलाठी व मंडल अधिकारी कार्यालयात खाजगी कर्मचारी कोतवाल काम करताना आढळून आल्यास संबंधित तलाठी व मंडल अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी शेतकऱ्याकडून खाजगी कर्मचारी कोतवाल आर्थिक पिळवणूक होत आहे.
फलटण तालुक्यातील तहसील कार्यालयातील रेकॉर्ड विभागातील सर्व शासकीय जुने महसुल अभिलेख महाराष्ट्र शासनाकडून स्कॅन करून संगणकृत करण्यात आले आहेत. तसेच याबाबत संगणक व प्रिंटर इतर साहित्य शासनाकडून तहसील कार्यालय फलटण यांना देण्यात आले आहे रेकॉर्ड विभागातील सर्व जुनी स्कॅन केलेल्या अभिलेख हे शेतकऱ्यांनी नक्कल मागणी अर्ज दिल्यास त्यांना संगणकृत स्वरूपात देण्याचे शासनाच्या सुचना व आदेश असताना गेल्या अनेक वर्षापासून वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांना तहसीलदार, निवासी नायब तहसीलदार व नायब तहसीलदार लिपिक व अव्वल लिपिक यांना हाताशी धरून या ठिकाणी खाजगी कोतवाल (खाजगी इसम) व शासकीय कोतवाल अभिलेखाचा शोध घेऊन छायांकित स्वरूपात शेतकऱ्यांना नक्कल पुरवत आहेत. याबाबत शेतकऱ्यांना पावती दिली जात नाही तसेच पावतीवर पोहोच घेतली जात नाही. आज अखेर आणि अनेक वर्ष संगणीकृत सातबारा स्कॅन केल्यापासून कोट्यावधीचा आर्थिक घोटाळा झाला आहे. अर्ज मुख्य आवक जावक नोंदवहीत न नोंदवता घेट रेकॉर्ड विभागात स्वीकारले जातात अनेक अर्थात मागणी असणारी नक्कल छायांकित स्वरूपात नक्कल देऊन हजारो रुपये घेऊन संबंधीत शेतकऱ्यांना पावती न देता तसेच सदर रकमेचा भरणा शासकीय तिजोरीत न करता कोट्यावधीचा रुपयांचा भ्रष्टाचार केला गेला आहे रेकॉर्ड विभागात छापांकित नकला देताना छायांकित प्रति करता खर्च कुठून होता केला जातो अशी सर्व चौकशी व्हावी. नक्कल अर्ज आवक-जावक मुख्यनोंद वहित नोदवले का जात नाहित, तत्काळ छायांकित नकला देणे बंद करण्यात यावे यापुढे फक्त संगणकृत स्कॅन केलेले नकला द्याव्यात. मुख्य आवक जावक विभागात नक्कल अर्ज स्वीकारण्यात यावेत,
शेतकऱ्यांकडून नक्कल मिळाल्याची पावतीवर पोहोच घ्यावी, तसेच आजखेर
कोणी कोणी किती रुपयांचा भ्रष्टाचार केला याची सविस्तर चौकशी व्हावी, या अनुषंगाने सेवा कालावधीत पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून अपसंपदा कमवली असून त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १६८८ कलम १३ (१) (ई) सह १३ (२) व भ्रष्टाचार प्रतिबंधक सुधारित अधिनियम २०१८ कलम १३ (१) (ई) सह १३ (२) नुसार चौकशी करुण कारवाई करावी अन्यथा १५ ऑगस्ट २०२४ रोजी आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटना सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांनी दिला आहे. यावेळी धनंजय महामुलकर सातारा जिल्हाध्यक्ष, प्रमोद गाडे राज्य प्रवक्ते, नितीन यादव अध्यक्ष फलटण तालुका, डॉक्टर रवींद्र घाडगे जिल्हा सरचिटणीस, किसन शिंदे, सागर गोडसे उपस्थीत होते. या निवेदनाच्या प्रती राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, महासंचालक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, विभागीय आयुक्त, पोलीस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंध विभाग पुणे, जिल्हाधिकारी यांना सादर केल्या आहेत. सदर प्रकरणी महसूल विभाग कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.