Saturday, September 26, 2026
Homeसाताराअन्यायाविरुद्ध आपण एकदा नवे तर शंभर वेळा उभा राहील असा पलटवार ;...

अन्यायाविरुद्ध आपण एकदा नवे तर शंभर वेळा उभा राहील असा पलटवार ; सचिन अहिवळे

फलटण : 30 वर्षांमध्ये फलटण तालुक्यात ज्यांची सत्ता आहे त्यांनी किती व कशी दादागिरी केली आहे हे संपूर्ण तालुक्याला माहित आहे. निष्पाप विरोधी कार्यकर्त्यांना कोणतेही कारण नसताना गुन्ह्यांमध्ये गोवण्याचे काम गेल्या 30 वर्षात राजे गटाच्या माध्यमातून केले गेले आहे. गेली 30 वर्षे नगरपरिषदेमध्ये त्यांची सत्ता असतानासुद्धा नगरपरिषदेत कायम दादागिरीच यांनी केली आहे. विरोधकांची कामे मुद्दामून रखडवण्याचे काम त्यांनी वेळोवेळी केले आहे. आत्ताच्या लोकसभा निवडणूकीत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना  फलटण तालुक्यातून जे मताधिक्य मिळाले त्यामुळे राजेगटाच्या पोटात गोळा आला असून रणजितसिंह यांचे नाव खराब करण्याचा कट मुद्दामून केला जात असल्याची टिका माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी केली.

फलटण शहरात दोन गटात मारामारी झाली आहे. दोन्ही गट एकाच समाजाचे आहेत. कोणावरही अन्याय होऊ नये व निरपराध लोकांवर गुन्हा दाखल होऊ नये यासाठीच आपण फलटण येथे डीवायएसपी राहुल धस यांना भेटलो असून यामुळेच फलटणची माजी नगराध्यक्ष रघुनाथराजे नाईक निंबाळकर माझी बदनामी करत आहेत. मात्र अन्यायाविरुद्ध आपण एकदा नवे तर शंभर वेळा उभा राहील असा पलटवार रघुनाथराजे यांच्यावर सचिन अहिवळे यांनी केला आहे. ते फलटण येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जेष्ठ माजी नगरसेवक अशोकराव जाधव, अनुप शहा, बजरंग गावडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना माजी नगरसेवक सचिन अहिवळे म्हणाले, भांडणाचे राजकीय भांडवल कसे करायचे याचे उत्तम उदाहरण म्हणजे पिट्टबाबा होय. या वादात घोलप कुटुंबातील एका व्यक्तीला मारहाण झाली असून या घोलपचे वडील कानिफ घोलप याचा मर्डर झाला होता त्याच्या आरोपीच्या पाठीमागे कोण उभे राहिले हे फलटण तालुक्याला चांगलेच माहीत असल्याचे सांगून आताच घोलप कुटुंबाचा पुळका का? असा सवाल यावेळी अहिवळे यांनी उपस्थित केला.

गेली तीस वर्ष सत्तेच्या माध्यमातून बंगल्यावरून फोन करून गुन्हा दाखल करायला लावले आहेत. तर आजही जाकीर मणेर या व्यक्ती विरोधात बिट्ट बाबा यांनीच गुन्हा दाखल करायला लावल्याचे सांगून

पोलीस तपासात जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे पोलिसांनी गुन्हे दाखल करावेत असे यावेळी सांगतानाच डीवायएसपी राहुल धस यांनी लोकशाही जिवंत ठेवली आहे असे सचिन अहिवळे म्हणाले. पोलीस प्रशासनाने राजकीय दबाला दबावाला बळी पडू नये असे यावेळी अहिवळे म्हणाले.

माजी बदनामी पिट्टबाबा यांनी केली आहे मात्र, ज्यांच्या व अन्याय होईल त्यांच्या मागे एकदा नव्हे तर शंभर वेळा उभा राहील असे सांगतानाच ज्यांच्यावर पिंटूबाबांनी खोटे गुन्हे दाखल केलेत त्यांच्या मागे आपण उभे असल्याचे सांगितले. कै. हिंदूराव नाईक निंबाळकर, माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, आमचे नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांच्या अडचणीत पाठीशी उभे राहायला शिकवले आहे. असे यावेळी सचिन अहिवळे म्हणाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments