Saturday, September 26, 2026
Homeसाताराश्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे दि 8 रोजी फलटण तालुक्यात आगमन,स्वागतासाठी...

श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे दि 8 रोजी फलटण तालुक्यात आगमन,स्वागतासाठी प्रशासन सज्ज,पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण उद्या

फलटण – श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे फलटण तालुक्यात उद्या सोमवार दि ८रोजी आगमन होत असून या पालखी मार्गावरील पहिले उभे ऐतिहासिक रिंगण उद्या दुपारी तरडगाव जवळ चांदोबाच्या लिंब येथे होणार आहे. फलटण तालुक्यात पालखी सोहळ्याच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून फलटण तालुक्यात माऊलीचा तीन दिवस मुक्काम असणार आहे.
श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या फलटण वास्तव्यादरम्यान शासकिय यंत्रणेच्या प्रत्येक विभागाने स्वच्छता, पाणी, आरोग्य, रस्ते, वीज, इंधन पुरवठा आदी महत्वपुर्ण बाबींमध्ये कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याबाबत दक्ष रहावे अशी सुचना देण्याबरोबर शासकीय यंत्रणांनी आपसी ताळमेळ राखत या सोहळ्यात सहभागी असणार्या वारकर्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही या दृष्टीने सज्ज राहून कार्यरत रहावे अशा सूचना यापूर्वीच प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या आहेत.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याच्या तालुक्यातील दि. 8 ते 10 जुलै या कालावधीतील वास्तव्या दरम्यान वारकर्यांना शासकीय यंत्रणेतील प्रत्येक विभागाने कशा पध्दतीने सेवा व सुविधा उपलब्ध करुन देण्याचे नियोजन केले आहे, याचा पुर्नआढावा घेण्यासाठी यापूर्वी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी फलटणला भेट देत आवश्यक सुचना करीत मार्गदर्शन केले.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे दिनांक 8 रोजी दुपारच्या सुमारास फलटण तालुक्याच्या हद्दीत सरदेचा ओढा येथे प्रशासन व राजकीय नेते मंडळींच्या हस्ते स्वागत करण्यात येणार असून त्यानंतर तरडगाव नजीक चांदोबाचा लिंब येथे पालखी मार्गावरील पहिले ऐतिहासिक उभे रिंगण होणार आहे. आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गाच्या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने चांदोबाचा लिंब येथील पुरातन मंदिर रस्त्याच्या कडेला पुनरस्थापित करण्यात आले असून या भागात उभे रिंगण सुरू असताना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये तसेच रस्ता रुंदीकरणाच्या नादात भाविकांना गैर सुविधाचा सामना करू लागू नये यासाठी प्रांताधिकारी सचिन ढोले व तहसीलदार डॉक्टर अभिजीत जाधव हे वैयक्तिक लक्ष देत असून पालखी मार्गावरील उड्डाणपुलाच्या अर्धवट कामामुळे निर्माण होणाऱ्या वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी स्वतः दररोज प्रांताधिकारी ढोले हे भेट देत आहेत. उड्डाणपूलांच्या लगतच्या पर्यायी रत्यांची कामे त्यांनी स्वतः पुढाकार घेत पूर्ण केली आहेत.
सोमवार दिनांक 8 रोजी पालखी सोहळ्याचा तरडगाव येथे मुक्कामी असून पालखीतळावरील सोयी सुविधांचा आढावा प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी घेऊन योग्य त्या सूचना केल्या आहेत. पालखीतळाची खूपसुंदर रित्या स्वच्छता करण्यात आली असून योग्य त्या वीज पुरवठ्याची सोय करण्यात आलेली आहे आरोग्य यंत्रणा 24 तास सज्ज ठेवण्यात आली आहे.
मंगळवार दि 9 रोजी पालखी सोहळा फलटण शहरात येणार आहे येथेही गैरसोय होऊ नये या दृष्टीने मुख्याधिकारी निखिल मोरे वैयक्तिक लक्ष देत आहे.
तालुक्यातुन एकुण 54 किलो मिटरचा मार्ग हा पालखी मार्ग असून या मार्गावरील झाडे, झुडपे काढून साईडपट्ट्यांसह रस्ते पूर्ण केले जात आहे. पुलाचे कठडे, गार्डस्टोन रंगविले जात आहे. सोहळा काळात कोणत्याही प्रकारच्या दुर्घटना होऊ नये तसेच चोऱ्यामाऱ्या होऊ नये भाविकांची चांगली सुरक्षितता करण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून पोलीस विभागाच्यावतीने एकूण 60 अधिकारी, 1200 कर्मचारी, वाहतुक नियोजनासाठी कर्मचारी तसेच होमगार्ड, विशेष कृती दलाची व्यवस्था केली आहे. त्याचप्रमाणे मुक्कामाच्या ठिकाणी जेष्ठ नागरिक व महिलांच्या सुरक्षेसाठी खास बंदोबस्त योजना, नियंत्रण शाखा, सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्कम कारवाईचे नियोजन स्वतः उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस हे जातीने लक्ष देऊन करत आहेत
पालखी मार्गावर 5 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. याचबरोबर रुग्णवाहिकेसह वैद्यकीय अधिकार्‍यांचे फिरते आरोग्यपथक पालखी मार्ग व पालखी तळावर २४ तासं कार्यरत राहतील याचे नियोजन करणे गरजेचे आहे. यावेळी फलटणपासून कोकण व कर्नाटकमधून येणार्‍या वारकर्‍यांची संख्या सोहळ्यात वाढते त्या अनुषंगाने औषध व्यवस्था, पाण्याच्या स्त्रोतांचे काटेकोर नियोजन करुन पिण्यास योग्य -अयोग्य दर्शविणारे फलक लावण्याची काळजी संबंधित नगरपालिका, ग्रामपंचायतीनींही घेण्याची गरज आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments