
बारामती:-फलटण तालुक्यातील तावडी येथील नामांकित बैलगाडा मालक रणजित निंबाळकर सर गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी गौतम काकडेंना पोलिसांनी अटक केली आहे. सुंदर नावाच्या बैलाच्या व्यवहारातून निंबाळकर आणि काकडे यांच्यात वाद झाला होता. रणजित निंबाळकर यांच्यावर गुरुवारी रात्री गोळीबार झाला होता. रणजित निंबाळकर यांवर गोळीबार झाल्यानंतर गौतम काकडे फरार होते.
शनिवारी पहाटे रणजित निंबाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाल्यानंतर रविवारी गौतम काकडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. गौतम काकडे यांना अटक करा यासाठी रणजित निंबाळकर यांच्या पत्नीने आत्मदहनाचा इशारा दिला होता. याप्रकरणी गौरव काकडे आणि शहाजी काकडे यांना पोलिसांनी अटक केली आहे.





