Monday, August 31, 2026
Homeसातारातेजस फाऊंडेशन नाशिक चा २०२४ चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार ; वैशाली...

तेजस फाऊंडेशन नाशिक चा २०२४ चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार ; वैशाली कांबळे

फलटण : फलटण येथील व फलटण एज्युकेशन सोसायटी फलटणचे मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज फलटण या प्रशालेत उपशिक्षिका या पदावर कार्यरत असलेल्या वैशाली संदिप कांबळे यांना तेजस फाऊंडेशन नाशिक चा २०२४ चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार वितरण सोहळा मौलाना आझाद संशोधन केंद्र टि. व्ही. सेंटर हाडको छत्रपती संभाजीनगर येथे सन्मानित करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे देवगिरी सहकारी साखर कारखाना फुलंब्री चे व्हाईस चेअरमन नितीन देशमुख, अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ मुंबई चे अध्यक्ष बाळासाहेब गोरे, लेखिका व समुपदेशक मुंबई सौ. मानसी राणे, लेखक मुंबई महेंद्र तुपे, तेजस फाउंडेशन नाशिक अध्यक्षा सौ. मेघा डोळस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी संस्थेचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्यातील कर्तुत्वान, गुणवंत व्यक्तींना त्यांच्या कार्याची दखल घेऊन राज्यस्तरावर हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.

या पुरस्काराबद्दल उपशिक्षका सौ. वैशाली कांबळे यांचे विधान परिषदेचे मा. सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्री संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन व जेष्ठ नेते मोहनराव नाईक निंबाळकर, जेष्ठ नेते भोजराज नाईक निंबाळकर, युवा नेते मेघराज नाईक निंबाळकर, युवा नेते शंभूराज नाईक निंबाळकर विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments