Mumbai High Court : आचार्य कॉलेजमधील हिजाबबंदी योग्यच! मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आव्हान याचिका

0
29
Mumbai High Court : आचार्य कॉलेजमधील हिजाबबंदी योग्यच! मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आव्हान याचिका


Acharya Maratha College of Chembur Hijab Ban case : चेंबूर येथील आचार्य मराठे कॉलेजने ड्रेस कोडच्या माध्यमातून विद्यालयाने हिजाब बंदी लागू करत आमच्या धार्मिक भावनांचा अनादर केला असं म्हणत  विद्यालयातील ९ विद्यार्थिनींनी मुंबई उच्च न्यायालयात या निर्णया विरोधात धाव घेतली होती. मात्र, ही याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. विद्यालयाचा ड्रेस कोडचा निर्णय योग्य असल्याचे देखील न्यायालयाने म्हटले आहे. मुलींनी सादर केलेल्या याचिकेचे महाविद्यालयाने कोर्टात खंडन केले. महाविद्यालयाच्या परिसरात करण्यात आलेली ही बंदी समान ड्रेसकोड लागू करण्यासाठी करण्यात आली होती, असा युक्तिवाद कोर्टात विद्यालयाच्या वकिलातर्फे करण्यात आला. कोर्टाने  हा युक्तिवाद ग्राह्य धरत ही याचिका फेटाळली आहे.



Source link