Sunday, September 20, 2026
HomeमनोरंजनChandu Champion Review: कार्तिक आर्यनच्या परफॉर्मन्समुळे मन होईल प्रसन्न! इमोशनल सीन्ससही कमाल

Chandu Champion Review: कार्तिक आर्यनच्या परफॉर्मन्समुळे मन होईल प्रसन्न! इमोशनल सीन्ससही कमाल

[ad_1]

काय आहे ‘चंदू चॅम्पियन’ची कथा?

‘चंदू चॅम्पियन’ ही एका मुरलीकांत नावाच्या व्यक्तीची कथा आहे, ज्याला चंदू म्हणून चिडवले जाते. पण आयुष्यातील संवाद त्यांना खऱ्या अर्थाने चॅम्पियन बनवतो. ‘मी चंदू नाही, मी चॅम्पियन आहे’, असा हा संवाद आहे. सुरुवातीच्या कथेत धमाल, मेहनत आणि खूप संघर्ष आहे. सर्वसामान्यांना प्रेरणा देईल अशी ही कथा आहे. एक चंदू कसा चॅम्पियन बनतो. ही कथा जुन्या मुरलीकांतपासून सुरू होते आणि फ्लॅशबॅकमध्ये जाते. ऑलंपिक सुवर्णपदक जिंकल्यावर चंदूचे तारुण्यातील जीवन यात दाखवले आहे. पुढे तो सैन्यात भरती होतो. पहिल्यांदा विमानात चढायला घाबरतो आणि १९६५च्या काश्मीरबरोबरच्या युद्धात साथीदारांना वाचवण्यासाठी छातीवर ९ गोळ्या झेलतो. या घटनेमुळे मुरलीकांत पेटकर यांचं आयुष्य बदलून गेलं होतं, जे चित्रपटातही पाहायला मिळालं आहे. दोन वर्षे कोमात राहिल्यानंतर जेव्हा मुरलीचा भाऊ त्याला खऱ्या जगासमोर घेऊन येतो, तेव्हा ते दृश्य मनाला स्पर्शून जाते. मुरलीला चालता येत नाही, पण जिद्दीने तो पोहायला शिकतो आणि मग चॅम्पियन बनतो.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments