
‘प्रेमाची गोष्ट’ या कलर्स मराठी वाहिनीवरील मालिकेत सागर कोळीची पूर्व पत्नी सावनी ही सतत काही ना काही तरी डाव आखत असते. गोखले आणि कोळी कुटुंबीयांच्या आयुष्यात राडा करण्याचा तिचा हेतू काही संपत नाहीये. ती स्वत:चा मुलगा आदित्यला ढाल बनवून आतापर्यंत खेळ खेळताना दिसली. पण आता तिला तिचा बॉयफ्रेंड हर्षवर्धनदेखील साथ देत आहे.







