Friday, September 25, 2026
Homeदेश-विदेशBomb Threat  | इंडिगो फ्लाइटला बॉम्बची धमकी, प्रवाशांनी खिडकीतून मारल्या उड्या अन्......

Bomb Threat  | इंडिगो फ्लाइटला बॉम्बची धमकी, प्रवाशांनी खिडकीतून मारल्या उड्या अन्… पाहा VIDEO | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

इंडिगो फ्लाइटला बॉम्बची धमकी, प्रवाशांनी खिडकीतून मारल्या उड्या अन्… पाहा VIDEO

IndiGo flight from Delhi to Varanasi : दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी देण्यात आली. त्यानंतर विमानत एकच गोंधळ उडाला.

दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी मिळाली आहे. यानंतर विमानात एकच गोंधळ उडाला. विमानाला तपासणीसाठी आयसोलेशन बेमध्ये हलवण्यात आले. तसेच विमान सुरक्षा आणि बॉम्ब निकामी करणारे पथक घटनास्थळी असल्याचे
विमानतळाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना आज (28 मे ) सकाळी, साडेपाचच्या सुमारास विमान उड्डाणाच्या तयारीत असताना ही धमकी मिळाली. ते म्हणाले की, विमानातील प्रवाशांना इमर्जन्सी एक्झिटद्वारे बाहेर काढण्यात आले. त्यानंतर विमानाला निर्जन भागात
नेण्यात आले आणि सुरक्षा एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण विमानाची तपासणी केली. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी केली असता असे काहीही नसल्याचे आढळून आले.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments