Wednesday, October 14, 2026
Homeक्रीडागंभीरला हवा संघ निवडीचा अधिकार

गंभीरला हवा संघ निवडीचा अधिकार

[ad_1]








नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने राष्ट्रीय संघाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकाची शोधाशोध सुरू केली आहे. त्यामुळे ‘बीसीसीआय’च्या रडारवर नंबर 1 उमेदवार कोलकाता नाईट रायडर्सचा मार्गदर्शक गौतम गंभीर असल्याचे वृत्त आहे. परंतु, या पदासाठी गंभीरच्या काही अटी असल्याचे आता पुढे आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, गंभीर भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारण्यास उत्सुक आहे; पण त्यासाठी अर्ज करण्यापूर्वी भारताच्या माजी फलंदाजाने ‘एक अट’ ठेवली आहे. गौतम गंभीरला संघ निवडण्याची पूर्ण मुभा हवी आहे आणि त्याने सुचवलेले खेळाडू त्याला हवे आहेत, याची हमी दिल्यानंतर तो अर्ज करण्यास इच्छुक असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. याशिवाय संघाचा कर्णधार, उपकर्णधार ठरवतानाही त्याला विश्वासात घ्यावे, असा त्याचा आग्रह आहे. असे समजते की रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या हे दोघेही कर्णधार, उपकर्णधार म्हणून गंभीरला नको आहेत. त्यामुळे या मुद्द्यावर ‘बीसीसीआय’ कशी भूमिका घेते यावर सगळे अवलंबून आहे.

टीम इंडियाचा कोच आणि राहुल द्रविडचा उत्तराधिकारी म्हणून अनेक नावे चर्चेत आहेत. व्हीव्हीएस लक्ष्मण आणि गौतम गंभीर ही भारतीय दिग्गजांची नावे यात आहेत. रिकी पाँटिंग, जस्टिन लँगर, स्टीफन फ्लेमिंग यांचीही नावे चर्चेत आहेत; पण लक्ष्मण स्वत: उत्सुक नाही, तर पाँटिंग व लँगर यांनी मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला नसल्याचे स्पष्ट केले. स्टीफन फ्लेमिंगचेही अद्याप निश्चित नाही.

मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे आहे. यासाठी किती जणांनी अर्ज केले आहेत, हे अद्याप कळलेले नाही. ‘बीसीसीआय’ने अलीकडेच मुख्य प्रशिक्षकपदासाठी रिकी पाँटिंग आणि जस्टिन लँगर यांच्याशी संपर्क साधण्यास नकार दिला होता. गंभीरने या पदासाठी अर्ज केला आणि भूमिका स्वीकारली, तर त्याला ‘केकेआर’चे मार्गदर्शक म्हणून आपले स्थान सोडावे लागेल. परंतु, याबाबत गंभीरने ‘केकेआर’चा मालक शाहरूख खानशी चर्चा केली नाही. जर तो या पदासाठी अर्ज करणार असेल, तर नक्कीच शाहरूखचे मत विचारात घेईल. कारण की, गौतम गंभीरने पुढच्या 10 वर्षांपर्यंत ‘केकेआर’च्या फ्रँचायझीसोबत राहावे, असे शाहरूखला वाटते. कोलकाताचे मार्गदर्शक पद स्वीकारावे म्हणून शाहरूख खानने कोरा चेकही ऑफर केला असल्याचे वृत्त आले होते.









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments