Wednesday, October 14, 2026
Homeक्रीडा१० सालं बाद..! कोलकाता IPL चॅम्‍पियन, हैदराबादवर ८ विकेट राखून विजय

१० सालं बाद..! कोलकाता IPL चॅम्‍पियन, हैदराबादवर ८ विकेट राखून विजय

[ad_1]








पुढारी ऑनलाईन डेस्‍क : संपूर्ण क्रिकेटविश्‍वाचे लक्ष वेधलेल्‍या इंडियन प्रीमियम लीग ( IPL2024 ) स्‍पर्धेत अखेर तब्‍बल १० वर्षांनंतर तो दिवस उजाडलाच. मागील १० वर्ष आयपीएल ट्रॉफीने हुलकावणी दिलेल्‍या कोलकाता संघाची स्‍वप्‍नपूर्ती झाली. कोलकाताने अंतिम सामन्‍यात हैदराबादचा ८ विकेट राखून पराभव  करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. २०१२ मध्‍ये गौतम गंभीर याच्‍या नेतृत्त्‍वाखालील संघाने आयपीएल ट्रॉफीवर कोलकात्‍याची मोहर उमटवली होती.

आयपीएल 2024च्या अंतिम सामन्यात कोलकाताने हैदराबादला पराभूत स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताचा फलंदाज व्यंकटेश अय्यरने केलेल्या अर्धशतकी  आणि रहमानउल्ला गुरबाजने  केलेल्या ३९ धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर कोलकाताने १०.३ ओव्हरमध्ये आव्हान पार करत अंतिम सामना जिंकला

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत हैदराबाद संघाने 18.3 षटकांत 10 गडी गमावून केवळ 113 धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात कमी धावसंख्या आहे. यापूर्वी 2013 मध्ये चेन्नईने मुंबईला 125 धावांचे लक्ष्य दिले होते.

हैदराबादच्या डावाची सुरूवात खराब झाली. अभिषेक शर्मा दोन धावा तर, ट्रॅव्हिस हेड खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. सामन्यात कोलकात्याच्या गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्यापुढे हैदराबाद गडगडला. राहुल त्रिपाठी 9, एडन मार्कराम 20, नितीशकुमार रेड्डी 13, हेनरिक क्लासेन 16, शाहबाज अहमद 8, अब्दुल समद 4, पॅट कमिन्स 24, जयदेव उंडकट 4 धावा केल्या. तर भुवनेश्वर कुमार खाते न उघडता नाबाद राहिला.

कोलकाताकडून आंद्रे रसेलने तीन तर स्टार्क आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. याशिवाय वैभव अरोरा, सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments