सातारा : पुढारी वृत्तसेवा : निर्लज्जपणाची हद्द झाली. प्रत्येक वेळी काही नसलं की, राजघराण्यावर बोलायचं. ज्या घराण्यामुळे तुमचा पक्ष उभा आहे त्यांच्याविषयी बोलताना थोडी तरी लाज राखा, असा टोला खा. उदयनराजे भोसले यांनी खासदार संजय राऊतांना लगावला. राहिला प्रश्न आमचा आदर, अनादर करण्याचा. तर कोणाचा घास नाही, असेही उदयनराजेंनी टीकाकरांना ठणकावले.
उदयनराजे भोसले म्हणाले की, “विकृत स्वभावामुळे खासदार संजय राऊतांकडून राजघराण्यावर वारंवार टीका केली जाते आहे. या विकृतीत वाढ होताना सध्या दिसत आहे. राजघराण्यावर बोलताना मोजून मापून समजून वक्तव्य केलं पाहिजे. असे व्यक्तव्य करणाऱ्यांना मी ओळखत नाही आणि त्यांना महत्त्वही देत नाही.”
संजय राऊत यांची विकृती इथपर्यंत पोहोचली की, त्यांनी यापूर्वी छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे आम्हाला मागितले हाेते. सत्तेत राहण्यासाठी या विकृतीचे लोक बरळतात. त्यांची विधानं राजकीय स्वार्थासाठीची असतात, असेही उदयनराजे या वेळी म्हणाले.
हेही वाचा :