Wednesday, September 16, 2026
Homeदेश-विदेशLok Sabha Election | राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत राडा;...

Lok Sabha Election | राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत राडा; बॅरिकेड्स तोडून कार्यकर्ते स्टेजजवळ | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत राडा; बॅरिकेड्स तोडून कार्यकर्ते स्टेजजवळ

‘इंडिया’ आघाडीच्या वतीने उत्तर प्रदेशातील फुलपूर येथे सभा आयोजित करण्यात आली होती. राहुल गांधी आधी येऊन व्यासपीठावर बसले होते. थोड्या वेळाने अखिलेशही आले. दोन्ही नेत्यांची भेट सुरू असतानाच खालच्या बाजूला कार्यकर्त्यांनी जोरजोरात आरडाओरडा सुरू केला.

प्रयागराज : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पाचव्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. त्यातच काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या संयुक्त सभेत रविवारी प्रचंड राडा झाला. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

‘इंडिया’ आघाडीच्या वतीने उत्तर प्रदेशातील फुलपूर येथे सभा आयोजित करण्यात आली होती. राहुल गांधी आधी येऊन व्यासपीठावर बसले होते. थोड्या वेळाने अखिलेशही आले. दोन्ही नेत्यांची भेट सुरू असतानाच खालच्या बाजूला कार्यकर्त्यांनी जोरजोरात आरडाओरडा सुरू केला. नेते व कार्यकर्ते व्यासपीठावर जाण्यासाठी धडपडत होते. सुरक्षेसाठीचे बॅरिकेट त्यांनी तोडून टाकले. हातात सपा आणि काँग्रेसचे झेंडे घेतलेल्या या नेते व कार्यकर्त्यांना शांत बसण्याचे वारंवार आवाहन करण्यात येत होते. मात्र, ते काही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. सर्व प्रयत्न फोल ठरत होते.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments