
मिळालेल्या माहितीनुसार, उपेंद्र हुडके असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा मूळचा नेपाळमधील बाचकुट या गावातील रहिवाशी आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तो पत्नीसह पुण्यातील वाकड येथे वास्तव्यास होता. परंतु, उपेंद्र त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. यामुळे त्यांच्यात वारंवार भांडण होत असे. दरम्यान, ११ मे २०२४ रोजी हुडके दाम्पत्यांमध्ये पुन्हा एकदा कडाक्याचे भांडण झाले. मात्र, यावेळी उपेंद्रने कहरच केला. त्याने पत्नीला मारहाण करत तिच्या गुप्तांगाच्या दोन्ही बाजूला खिळे ठोकले आणि कुलूप लावले. यात त्याची पत्नी गंभीर जखमी झाली. तिच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वाकड पोलिसांनी रुग्णालयात महिलेचा जबाब नोंदवला.




