
फलटण :फलटण येथे विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, भारतीय जनता पार्टीचे माढा लोकसभेचे उमेदवार तथा विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,माणिकराव सोनवलकर, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर, श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, युवा नेते श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, गोविंद मिल्कचे संचालक श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर यांच्यासह फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात अनेकांनी आपला मतदाना हक्क बजावला आहे.
फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात एकुण 3 लाख 35 हजार 999 मतदारांपैकी 2 लाख 15 हजार 815 मतदारांनी माढा लोकसभा मतदारसंघासाठी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. म्हणजेच एकूण 64.23% मतदान झाले असल्याची माहिती फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
दरम्यान तिसऱ्या टप्प्यात आज संपूर्ण देशात गाजलेल्या माढा मतदारसंघात सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते या मध्ये प्रामुख्याने महायुतीचे अधिकृत उमेदवार खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात प्रमुख लढत होत असून इतर पक्षांसह अपक्ष उमेदवार असे एकूण 32 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून 4 जून च्या निकालाकडे आता सर्वांची नजर असणार आहे.
43 माढा मतदारसंघात एकूण सहा मतदारसंघ येतात या मध्ये माढा,करमाळा,सांगोला,माळशिरस, व माण तसेच फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघ येतात मात्र सर्वांचे लक्ष लागून राहिले होते ते फलटण कडे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे व केलेली विकासकामे या जोरावर मते मागत होते तर भाजप पक्षात बंडखोरी करून राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार)गटाकडून अकलूज चे धैर्यशील मोहिते पाटील यांना फलटण मधून मिळालेली मदत यामुळे सर्वांचेच लक्ष फलटण कडे वेधले गेले होते.
दरम्यान आज मंगळवार दि.7 रोजी फलटण शहरासह तालुक्यातील 341 ठिकाणी मतदानाला सुरुवात झाली, किरकोळ अपवाद वगळता सर्वच ठिकाणी सकाळपासून मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी रांगा लागल्या होत्या, या मध्ये सात ठिकाणी मतदान यंत्रात किरकोळ बिघाड झाल्याने काहीवेळ मतदान ठप्प झाले होते, मात्र पर्यायी व्यवस्था करण्यात आल्याने पुन्हा मतदान सुरळीत चालू झाले,उन्हाचा तडाखा असल्याने सकाळी सकाळी अनेकांनी आपल्या मतदानाचा पवित्र हक्क बजावला,या मध्ये विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी येथील मुधोजी क्लब फलटण येथे मतदान केले व विद्यमान उमेदवार खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सपत्नीक निंभोरे ता.फलटण येथे मतदान केले.
फलटण कोरेगाव(अ.जा.)मतदारसंघात पुरुष 172046 व स्त्री 163939 व इतर 14 असे एकूण 335999 मतदार असून या मध्ये 215815 एकूण मतदारांनी मतदान केले.सकाळी 11 पर्यंत 18.54%, तसेच दुपारी 1 पर्यंत 29.77%दुपारी 3 पर्यंत 42.76%सायंकाळी 5 वाजता 51.56% व शेवटच्या एका तासात 12.67% मिळून संपूर्ण मतदारसंघात 64.23 %मतदान किरकोळ अपवाद वगळता शांततेत पार पडले असल्याचे प्रांताधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.








