Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशBrazil Rain | ब्राझीलमध्ये अतिवृष्टी, आतापर्यंत 57 जणांचा मृत्यू, 67 लोक बेपत्ता;...

Brazil Rain | ब्राझीलमध्ये अतिवृष्टी, आतापर्यंत 57 जणांचा मृत्यू, 67 लोक बेपत्ता; 32 हजारांहून अधिक लोक बेघर | Navarashtra (नवराष्ट्र)

Brazil Rain | ब्राझीलमध्ये अतिवृष्टी, आतापर्यंत 57 जणांचा मृत्यू, 67 लोक बेपत्ता; 32 हजारांहून अधिक लोक बेघर | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

ब्राझीलमध्ये अतिवृष्टी, आतापर्यंत 57 जणांचा मृत्यू, 67 लोक बेपत्ता; 32 हजारांहून अधिक लोक बेघर

राज्यातील 497 शहरांपैकी दोन तृतीयांश शहरांना वादळाचा फटका बसला आहे. पुरामुळे अनेक भागातील रस्ते आणि पूल उद्ध्वस्त झाले.

ब्राझीलच्या दक्षिणेकडील रिओ ग्रांदे डो सुल राज्यात मुसळधार पाऊस (Brazil Rain) सुरू आहे. या पावसामुळे पूर येऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. आतापर्यंत 57 जणांचा मृत्यू झाला असून 67 लोक अद्याप बेपत्ता आहेत. तर 32 हजारांहून अधिक लोक बेघर झाले आहेत. राज्यातील 497 शहरांपैकी दोन तृतीयांश शहरांना या पावसाचा फटका बसला आहे. पुरामुळे अनेक भागातील रस्ते आणि पूल उद्ध्वस्त झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

उरुग्वे आणि अर्जेंटिनाच्या सीमेवर असलेल्या रिओ ग्रांदे डो सुलच्या नागरी संरक्षण प्राधिकरणाने सांगितले की, 67 लोक अद्याप बेपत्ता आहेत. 32 हजारांहून अधिक लोक बेघर झाले आहेत. राज्यातील 497 शहरांपैकी दोन तृतीयांश शहरांना वादळाचा फटका बसला आहे. पुरामुळे अनेक भागातील रस्ते आणि पूल उद्ध्वस्त झाले. भूस्खलनामुळे एका लहान जलविद्युत प्रकल्पातील धरणाचे अंशत: नुकसान झाले. बेंटो गोन्साल्विस शहरातील दुसरे धरणही कोसळण्याचा धोका आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

रिओ ग्रांदे डो सुलची राजधानी पोर्टो अलेग्रे येथील गुएबा सरोवरात पाणी वाढल्यामुळे पूर आला. पोर्टो अलेग्रेच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाने सर्व उड्डाणे अनिश्चित काळासाठी स्थगित केली आहेत. राज्याच्या हवामान खात्यानुसार, पुढील छत्तीस तासांत रिओ ग्रांदे डो सुलच्या उत्तर आणि ईशान्य भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, पावसाचे प्रमाण कमी होत आहे.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments