Thursday, August 27, 2026
Homeसाताराफलटण ग्रामीण पोलीसांनी खुनाच्या गुन्हेतील दोन फरारी आरोपींना अटक

फलटण ग्रामीण पोलीसांनी खुनाच्या गुन्हेतील दोन फरारी आरोपींना अटक

फलटण :फलटण ग्रामीण पोलीसांना आठ वर्षा पूर्वी राजाळे परिसरात घडलेल्या खुनाच्या घटनेतील दोन फरारी आरोपींना अटक करण्यात यश आले आहे

बाबत ग्रामीण पोलीस स्टेशनकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आठ वर्षापूर्वी राजाळे परिसरात खूनाची घटना घडली होती. याप्रकरणी गुन्हा 79/16 कलम 302,143,145,147 149 दाखल झाला होता. यातील तीन आरोपी अटक झाले होते पण बाकी दोन आरोपी फिरस्ते असलेमुळे मिळून येत नव्हते. पोलीसांनी त्यांना पकडण्याचे अनेक वेळा प्रयत्न केले होते परंतु प्रत्येक वेळी ते पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जात होते. दरम्यान सदर आरोपी दत्त्या बिस्कुट्या भोसले वय 45 रा. राजाळे, वैशी उर्फ राजश्री दत्या भोसले वय 40 यात्रेनिमित्त राजाळे येथे आले असलेची माहिती पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांना मिळाली. त् तात्काळा पीएसआय गोपाळ बदाने, नितीन चातुरे, अमोल जगदाळे, तात्या कदम, हनुमंत दड़स वैभव सर्यवंशी महिला पोलिस कर्णे याना पाठवून आरोपींना राजाळे येथून अटक केले

निवडणूक काळात प्रत्येक फरारी आरोपींना अटक करा असे आदेश जिल्हा पोलिस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक अंचल दलाल, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांनी दिले आहेत. त्याप्रमाणे आरोपींना अटक करण्यास ग्रामीण पोलिस प्राधान्य देत आहेत. निवडणूक जाहीर झाले पासून ग्रामीण पोलिसांना 5 फरारी आरोपींना जेरबंद करण्यात यश आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments