श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी माढा लोकसभेचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या भेट

0
24
श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी माढा लोकसभेचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या भेट

फलटण : माढा लोकसभा मतदार संघाच्या तिसऱ्या टप्प्यात होत असलेली लोकसभेची निवडणूक सध्या रंगतदार वळणावर येऊन पोहोचली आहे . माढा लोकसभा संघावर आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे . या मतदार संघात देशातील व राज्यातील महत्वाच्या नेत्यांनी उडी घेतली आहे . या मतदारसंघामध्ये महा विकास आघाडीचे माजी केद्रीय मंत्री शरद पवार व महायुतीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांनी सभेच्या धडाका लावला आहे . अशातच अनेक मातब्बर नेते मंडळी आपली पक्षीय भूमिका बदलताना दिसत असल्याने माढा लोकसभा मतदारसंघात रोज नवनवीन घडामोडी पाहायला मिळत आहेत . राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे निष्ठावंत मानले जाणारे श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर (निंबाळकर ) संचालक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक तर फलटण पंचायत समितीचे माजी सभापती व फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन म्हणून भरीव असे काम केले आहे पूर्व भागाचे नेते असलेले श्रीमंत शिवरूपराजे श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर  खर्डेकर हे सुरवडी येथील निसर्ग हॉटेल मध्ये भाजपा प्रमुख कार्यकर्त्याची बैठक खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली या बैठकीत त्यांनी उपस्थिती लावली

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याशी शिवरूपराजे यांच्याशी माढा लोकसभा निवडणूकी विषयी महत्वाच्या विषयावर चर्चा केल्या. शिवरूपराजे खर्डेकर निंबाळकर यांच्या भेटीने मतदार संघात नवा ट्विट्स निर्माण झाला आहे. यावेळी फलटण कोरेगाव विधानसभा प्रभारी सचिन कांबळे – पाटील यांच्यासह माजी नगरसेवक व प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर – निंबाळकर हे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक आहेत तर फलटण पंचायत समितीचे माजी सभापती, व फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती माजी चेअरमन म्हणून त्यांनी फलटण तालुक्यात भरीव काम केले आहे. फलटण पूर्व भागात श्रीमंत शिवरूपराजे यांना मानणारा मोठा मतदार वर्ग असून एकूणच फलटण तालुक्यात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. अजातशत्रू म्हणून ओळख असणारे शिवरूपराजे व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या भेटीने फलटण तालुक्यातील नवी नराजकीय गणिते मांडली जात आहेत.