Tuesday, September 1, 2026
Homeदेश-विदेशAstraZeneca-Covishield | मोठी बातमी! AstraZeneca कंपनीनं मान्य केलं की, लोकांमध्ये कोवीशिल्ड लसीचे...

AstraZeneca-Covishield | मोठी बातमी! AstraZeneca कंपनीनं मान्य केलं की, लोकांमध्ये कोवीशिल्ड लसीचे दुर्मिळ दुष्परिणाम होऊ शकतात | Navarashtra (नवराष्ट्र)

AstraZeneca-Covishield | मोठी बातमी! AstraZeneca कंपनीनं मान्य केलं की, लोकांमध्ये कोवीशिल्ड लसीचे दुर्मिळ दुष्परिणाम होऊ शकतात | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

मोठी बातमी! AstraZeneca कंपनीनं मान्य केलं की, लोकांमध्ये कोवीशिल्ड लसीचे दुर्मिळ दुष्परिणाम होऊ शकतात

कोरोना महामारीच्या काळात, AstraZeneca आणि Oxford University द्वारे विकसित Covishield ची निर्मिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने केली होती आणि ती देशातील लोकांना मोठ्या प्रमाणात दिली जात होती.

कोरोना लस घेतल्यानंतर त्याचे दुष्परिणाम होत असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत होत्या. याविषयी अनेक चर्चा होत असताना आता कोविशील्ड कोरोना लसविषयी मोठी बातमी समोर आली आहे. AstraZeneca, या अँटी-कोविड-19 लस ‘कोविशील्ड’ बनवणाऱ्या कंपनीने स्वतः मान्य केलं आहे की ही लस घेत असलेल्या लोकांमध्ये दुर्मिळ दुष्परिणाम होऊ शकतात. The Telegraph (UK) च्या अहवालानुसार, ब्रिटिश फार्मा कंपनी AstraZeneca ने मान्य केले आहे की, त्यांच्या कोविड लसीचे दुर्मिळ दुष्परिणाम होऊ शकतात. लस निर्मात्याने न्यायालयीन कागदपत्रांमध्ये म्हटले आहे की कोविशील्ड क्वचित प्रसंगी रक्ताच्या गाठी आणि कमी प्लेटलेटची समस्या निर्माण होऊ शकते.

AstraZeneca आणि Oxford University द्वारे विकसित केलेली Covishield लस भारताच्या सीरम इन्स्टिट्यूटने कोरोना साथीच्या काळात तयार केले होती आणि ते देशातील लोकांना मोठ्या प्रमाणावर देण्यात आली. मात्र त्यानंतर अनेकांना झालेल्या विविध तक्रारीनंतर ॲस्ट्राझेनेकावर ब्रिटनमध्ये अनेक खटले दाखल करण्यात आले. या लसीमुळे अनेक मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता. हे प्रकरण ब्रिटन उच्च न्यायालयात पोहोचलं होतं.  51 प्रकरणांमध्ये, पीडितांनी 100 दशलक्ष पौंडपर्यंत नुकसान भरपाईची मागणी केली आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments