
बिहारची राजधानी पाटणा येथील रेल्वे जंक्शनजवळील एका हॉटेलला (Hotel Fire) गुरुवारी भीषण आग लागली. या आगीत सहा जणांना होरपळून मृत्यू झाला. तर 20 जण भाजले आहेत. जखमींना जवळच्या 40 जण होरपळले.
पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथील रेल्वे जंक्शनजवळील एका हॉटेलला (Hotel Fire) गुरुवारी भीषण आग लागली. या आगीत सहा जणांना होरपळून मृत्यू झाला. तर 20 जण भाजले आहेत. जखमींना जवळच्या 40 जण होरपळले. या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आग एवढी भीषण होती की, काही क्षणातच दुसऱ्या इमारतीपर्यंत पोहोचली. काही जणांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.
सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे आग लागली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांना काही तासांनी आग विझवण्यात यश आले. आदर्श हॉटेलजवळ लागलेल्या या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. या घटनेपासून रेल्वे स्थानक केवळ 50 मीटरच्या अंतरावर आहे.









