माढा लोकसभा मतदारसंघाचे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते – पाटील यांच्या प्रचाराच्या नारळ श्रीराम मंदिर येथे फोडण्यात आला

0
18
माढा लोकसभा मतदारसंघाचे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते – पाटील यांच्या प्रचाराच्या नारळ श्रीराम मंदिर येथे फोडण्यात आला

फलटणः माढा लोकसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तिकिट मिळाल्यापासून माढा लोकसभा मतदारसंघात त्यांच्या उमेदवारीला अकलूज चे मोहिते पाटील व फलटणचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व राजेगट यांच्या प्रचंड विरोध होता परतू रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सर्व गोष्टीवर म त करत माढा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळून घेतली आणि मोहिते पाटील व श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या राजे गट प्रचंड नाराज झाल्या असल्यामुळे अकलूजचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरदचंद्र पवार यांच्या गटाची तुतारी हातात घेतली असून फलटणचे राजगट्याचे श्रीमंत रघूनाथराजे नाईक निंबाळकर यांनी उघडपणे धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठींबा जाहिर केला त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघाची एकतर्फे वाटणारी निवडणूक आता चुरशीची झाली

माढा लोकसभा मतदार संघाकडे सध्या महाराष्ट्रातील सर्वाचे लक्ष लागले आहे . माढा मतदारसंघाचे राजकारण सध्या फलटण तालुक्याच्या भोवती फिरत असल्याचे जाणवत आहे . महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात फलटण तालुक्याचे राजकुमार व त्याचे शिलेदार प्रत्यक्षात शरदचंद्र पवार गटाची तुतारी हातात घेत प्रत्यक्षात निवडणूकीच्या मैदानात उतरले आहेत . आणि त्यामुळे फलटणच्या राजकारणात नविन समीकरण तयार झाले आहे

विधान परिषदेचे माजी सभापती व आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे सातारा जिल्हा व फलटण तालुक्यावर एक हाती गेली तीस वर्ष वर्चस्व असून या वर्चस्वाला मागील पाच वर्षापासून भाजपाचे माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विरोध निर्माण क्षय देण्याचे काम केले आहे . मागील लोकसभा निवडणुकीत राजे गटाचा प्रचंड विरोध असताना ही भाजपाचे खासदार माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकून आले होते त्यामुळे विधान परिषदेचे माजी सभापती व खासदार यांच्यात मतभेद वाढले आहेत तसेच विकास कामावरून दोघांच्यात सतत तू तू मै मै होत असती

मागील अडीच वर्षाच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडले होत्या ‘राज्यातील माविआचे सरकार जाऊन राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे . भाजप महायुतीत यामध्ये शिवसेना (एकनाथ शिंदे ) व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार ) हे सहभागी झाले . यामध्ये माजी सभापती व आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सहभागी झाले व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे सातारा जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे झाले .

पंरतु हे सर्वजण महायुतीत असताना लोकसभेची निवडणूक लागली आणि महायुतीचे उमेदवार म्हणून माढा चे खासदार म्हणून पुन्हा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली तेव्हा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व राजेगट हा पाठिंबा देतोय का याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते . मात्र आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध केला . उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या धर्म पाळण्याचे सांगितले परंतू श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या विरोध काही केल्या कमी झाला नाही ते व त्यांचे बंधु श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे संध्या अलिप्त आहेत

फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, त्यांचे पुत्र माजी सभापती विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, पत्नी श्रीमंत प्रियालक्ष्मीराजे, आमदार श्रीमंत रामराजे यांचे पुत्र श्रीमंत अनिकेतराजे, बहीण श्रीमंत सुभद्राराजे, श्रीमंत संजीवराजे यांचे पत्नी श्रीमंत शिवांजलीराजे, पुत्र श्रीमंत सत्यजितराजे हे उघडपणे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारात सहभागी झाले आहेत. त्यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडण्यात आला.

फलटण येथे काल धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी वरील सर्वजण उपस्थित होते. त्याचबरोबर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, त्यांचे नातू आणि आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र विश्वतेज मोहिते पाटील हे सुद्धा उपस्थित होते. राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉक्टर सचिन सूर्यवंशी (बेडके) त्यांचे बंधू महेंद्र सूर्यवंशी (बेडके), आमीरभाई शेख हे सुद्धा कार्यकर्त्यां सह उपस्थित होते. या सर्वांशी वेळोवेळी श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर चर्चा करताना दिसत होते. राजेंचे सन आणि सैन्य महाविकास आघाडी बरोबर गेल्याने पुढील काळात फलटणचे राजकारणात काय काय घडणार

याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. सन आणि सैन्य महाविकास आघाडी बरोबर आल्याने आता आमदार श्रीमंत रामराजे आणि श्रीमंत संजीवराजे हे सुध्दा उघडपणे महाविकास आघाडीचा प्रचार करणार का पडद्यामागून सूत्र हलवणार. सन & सैन्य यांची तुतारी किती मताधिक्य मोहिते पाटील यांना देणार, प्रत्यक्ष मतदार काय करणार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खा रणजितसिंह नाईक निंबाळकर काय बोलणार, खा रणजितसिंह हे राजेंचा विरोध डावलून किती मताधिक्य घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.