Saturday, August 22, 2026
Homeदेश-विदेशAnaconda Snake : सुटकेसमध्ये भरून आणले १० जिवंत अ‍ॅनाकोंडा साप; विमान प्रवाशाला...

Anaconda Snake : सुटकेसमध्ये भरून आणले १० जिवंत अ‍ॅनाकोंडा साप; विमान प्रवाशाला झाली अटक

Anaconda Snake : सुटकेसमध्ये भरून आणले १० जिवंत अ‍ॅनाकोंडा साप; विमान प्रवाशाला झाली अटक

[ad_1]

बेंगळुरू विमानतळावर तब्बल दहा अॅनाकोंडा सापाची तस्करी करण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला आहे. सुटकेसमध्ये पिवळ्या रंगाचे, दहा अॅनाकोंडा जातीचे साप भरून आणणाऱ्या एका तरुणाला कस्टमच्या अधिकाऱ्यांनी विमानतळावर अटक केली आहे. जप्त करण्यात आलले सर्व साप सुटकेसमध्ये जिवंत आढळले आहे. हा विमानप्रवासी साप घेऊन थायलंडची राजधानी बँकॉकहून बेंगळुरू विमानतळावर उतरला होता. प्रवाशाने त्याच्या चेक-इन सुटकेसमध्ये अॅनाकोंडा साप लपवून आणले होते, अशी माहिती कस्टमच्या अधिकाऱ्यांनी दिली. प्रवाशाच्या सुटकेसची तपासणी केली असता सापांच्या तस्करीचा प्रकार उघडकीस आला. बेंगळुरू विमानतळावर कार्यरत कस्टम विभागाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पकडण्यात आलेल्या अॅनाकोंडा सापाचे फोटो शेअर केले आहेत. या प्रवाशावर वन्यजीवांची बेकायदेशीर तस्करी करण्याचे कलम लावण्यात आले आहे. कस्टम अधिकाऱ्यांनी या प्रवाशाचे नाव मात्र अद्याप जाहीर केलेेले नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments