Saturday, August 22, 2026
Homeदेश-विदेशसारखं ओरडायचे पास हो, रागावलेल्या मुलाने वडिलांचीच 10ची मार्कशीट केली व्हायरल... पाहा...

सारखं ओरडायचे पास हो, रागावलेल्या मुलाने वडिलांचीच 10ची मार्कशीट केली व्हायरल… पाहा Video

सारखं ओरडायचे पास हो, रागावलेल्या मुलाने वडिलांचीच 10ची मार्कशीट केली व्हायरल… पाहा Video

[ad_1]

Viral News : इंटरनेटच्या युगात सोशल मीडियावर दररोज कोणते ना कोणते व्हिडिओ किंवा फोटो व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ मजेदार असतात तर काही विचार करायला लावणारे असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. सध्या परीक्षेचा काळ सुरु आहे. या दिवसात सोशल मीडियावर अतरंगी विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका (Answer Sheet) व्हायरल होत असतात. पण एका मुलाने चक्का आपल्या वडिलांचीच मार्कशीट सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. 

सोशल मीडियावर मार्कशीट व्हायरल
सोशल मीडिया एक्सवर दहावीची मार्कशीट एका युजरने शेअर केली आहे. यासोबत युजरने कॅप्शनमध्ये लिहिलंय, वडिलांची मार्कशीट सापडली. या मुलाने मार्कशीटचा (Mark Sheet) व्हिडिओ बनवला आहे. यात त्याने म्हटलंय, पास होण्यासाठी वडील सारखे ओरडायचे, आता मला त्यांची दहावीची मार्कशीट सापडली आहे’ व्हिडिओत हा मुलगा पुढे जे बोलतो ते ऐकून हसू आवरणार नाही.

या व्हिडिओत मार्कशीट दाखवतानाच मुलाचा आवाजही ऐकू येत आहे. यात तो सांगतोय ‘ मित्रांना आमचे वडील ओरडून ओरडून सांगतात की पास हो पास हो, आणि हे पाहा त्यांची दहावीची मार्कशीट. जितके विषय आहेत, सर्वात ते नापास झआले आहेत. ही माझ्या वडीलांची मार्कशीट आहे’

व्हिडिओवर हजारो कमेंट्स
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ  @desi_bhayo88 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत जवळपास 4 लाखाहून अधिकवेळा पाहिला गेलाय. यावर साडेचार हजाराहून अधिक लाईक्स आल्या आहे. हजारो युजर्सने मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युजरने म्हटलंय वडील नापास झाले म्हणूनच ते तुला पास होण्यास सांगत आहेत. तर एकाने म्हटलंय वडिलांची मार्कशीट व्हायरल करुन काय होणार? वडील तर नापास झाले तूला ही नापास व्हायचंय का? 

उत्तरपत्रिका व्हायरल
याआधीही सोशल मीडियावर अतरंगी विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका व्हायरल झाल्या आहेत. अशा विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासणं हे शिक्षकांसमोर एक आव्हानच असतं. दहावीच्या एका विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेचा फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला होता. त्या विद्यार्थ्याने आपल्या उत्तरपत्रिकेत चक्क पुष्पा चित्रपटातील डायलॉग लिहिले होते. एका विद्यार्थ्याने रसायनशास्त्राच्या उत्तरपत्रिकेत चक्क शायरी लिहिली होती. ‘ये मोहब्बत भी क्या चीज है, न जीने देती है न मरने देती है. ये दुआ करो वो न मिले तो मैं मर ही जाऊं.’ त्यानतंर ठळक आणि मोठ्या अक्षरात त्याने I LOVE MY POOJA असंही लिहिलं.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments