Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशState Excise Department action | निवडणुकीत मतदारांना विविध प्रलोभनं, राज्य उत्पादन...

State Excise Department action | निवडणुकीत मतदारांना विविध प्रलोभनं, राज्य उत्पादन शुल्क विभागानं आतापर्यंत 8 कोटींचा मुद्देमाल केला जप्त! | Navarashtra (नवराष्ट्र)

State Excise Department action  | निवडणुकीत मतदारांना विविध प्रलोभनं, राज्य उत्पादन शुल्क विभागानं आतापर्यंत 8 कोटींचा मुद्देमाल केला जप्त! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

Money (7)

लोकसभा निवडणुकीची आचारसंहीता जाहीर झाल्यापासून अनेकांनी आचारसंहीतेचा भंग केलाय. राज्य उत्पादन शुल्क विभागाने आचरसंहिता लागू झाल्यापासून तब्बल 4 हजार 255 गुन्हे दाखल केले आहेत.

देशात आज लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पहिल्या टप्प्प्यातील मतदान पार पडत आहे. 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील लोकसभेच्या 102 जागांसाठी मतदान (Voting) सुरू झालं आहे. या निवडणुकीच्या धुमाळीत एक मोठी बातमी समोर येत आहे. मतदारांना आपल्याकडे आकर्षीत करण्यासाठी उमेदवार वेगवेगळी प्रलोभन देतात. अशाच उमेदवारांवार राज्य उत्पादन शुल्क विभागानं नजर ठेवली होती. मिळालेल्या माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्क विभागाने आचरसंहिता लागू झाल्यापासून तब्बल 4 हजार 255 गुन्हे दाखल केले आहेत. तर आत्तापर्यंत 7 कोटी 90 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

हे सुद्धा वाचा

आत्तापर्यंत 3 हजार 754 आरोपींना अटक

लोकांमध्ये निष्पक्ष मतदान करावं यासाठी प्रशासनाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येतात. मात्र, काही ठिकाणी उमदेवारांकडून मतदारांना विविध प्रकारची प्रलोभनं देण्यात येण्याचे प्रकार नेहमीचं उघडकीस येतात.  अशावेळी पार्ट्यांचं देखील मोठ्या प्रमाणात आयोजन केलं जातं. त्यावर अंकुश ठेवण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाला मोठं यश आलं आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहीता जाहीर झाल्यापासून अनेकांनी आचारसंहीतेचा भंग केलाय. राज्य उत्पादन शुल्क विभागाने आचरसंहिता लागू झाल्यापासून तब्बल 4 हजार 255 गुन्हे दाखल केले आहेत. तर या गुन्ह्यात 3 हजार 754 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. तर या सर्व कारवाई दरम्यान उत्पादन शुल्क विभागाने 7 कोटी 90 लाखांचा मुद्देमाल आतापर्यंत जप्त केला आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments