Farmers Agitation | शेतकरी पुन्हा आक्रमक; शंभू स्थानकावर रेल्वे रोखली, बॅरिकेड्स तोडून आंदोलक रूळावर | Navarashtra (नवराष्ट्र)

0
20
Farmers Agitation | शेतकरी पुन्हा आक्रमक; शंभू स्थानकावर रेल्वे रोखली, बॅरिकेड्स तोडून आंदोलक रूळावर | Navarashtra (नवराष्ट्र)


शेतकरी पुन्हा आक्रमक; शंभू स्थानकावर रेल्वे रोखली, बॅरिकेड्स तोडून आंदोलक रूळावर

मध्यंतरी शांत झालेले शेतकऱ्यांचे आंदोलन पुन्हा पेटले आहे. पंजाब-हरयाणाच्या शंभू सीमेवर आंदोलक शेतकऱ्यांनी शंभू स्थानकावर रेल्वे वाहतूक रोखली. शेतकऱ्यांनी शंभू हद्दीजवळील रेल्वे रुळावर ठिय्या दिला होता.

अंबाला : शेतकऱ्यांचे आंदोलन मध्यंतरी शांत झाले होते. मात्र, आता हे आंदोलन पुन्हा पेटले आहे. पंजाब-हरियाणाच्या शंभू सीमेवर आंदोलक शेतकऱ्यांनी शंभू स्थानकावर रेल्वे वाहतूक रोखली. शेतकऱ्यांनी शंभू हद्दीजवळील रेल्वे रुळावर ठिय्या दिला होता. त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्याने पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये झटापट झाली. परंतु, शेतकरी बॅरिकेड तोडून रुळावर बसले.

युवा नेते नवदीपसिंग जलबेडा यांच्यासह 3 शेतकऱ्यांची सरकारने सुटका करावी, या मागणीसाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यांची हरियाणा-पंजाब सरकारसोबत बैठक झाली होती. सरकारने त्यांच्या सुटकेचे आश्वासन दिले होते. त्यानंतर शेतकऱ्यांना आंदोलनास भाग पाडले.






Source link