Wednesday, September 30, 2026
Homeदेश-विदेशRam Lalla Surya Tilak | गर्भगृहात सूर्यकिरणांनी उजळलं रामलल्लाचं कपाळ, पाहा सुर्यभिषेकाची...

Ram Lalla Surya Tilak | गर्भगृहात सूर्यकिरणांनी उजळलं रामलल्लाचं कपाळ, पाहा सुर्यभिषेकाची मोहून टाकणारी दृष्यं! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

गर्भगृहात सूर्यकिरणांनी उजळलं रामलल्लाचं कपाळ, पाहा सुर्यभिषेकाची मोहून टाकणारी दृष्यं!

रामनवमची औचित्यावर आज अयोध्येत रामलल्लाचा सूर्याभिषेक पार पडला. यावेळी सूर्याची किरणे रामललाच्या कपाळावर पडताच त्यांचं कपाळ उजळलं.

रामनगरी अयोध्येत आज रामनवमी (Ramnavami 2024) साजरी होत आहे. नवीन भव्य राम मंदिरात भगवान श्री राम जन्मोत्सव साजरा होत आहे. आज दुपारी 12 वाजता राम मंदिरात रमालल्लाचा सुर्यभिषेक करण्यात आला. या  सुर्यभिषेकासाठी गर्भगृहात खास साधनांचा वापर करण्यात आला होता. सूर्याची किरणं रामलल्लाच्या कपाळावर पडताच त्यांचं कपाळ उजळलं. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट यांनी या भव्यदिव्य सोहळ्याचे फोटो एक्सवर शेअर केले आहेत. बघुयात कसा पार पडला रामलल्लाचा सुर्यभिषेक.

हे सुद्धा वाचा

कसा झाला सुर्याभिषेक?

आज सकाळच्या सुमारास सुर्यभिषेकाआधी रामललाचा दिव्य श्रृंगार करण्यात आला होता. दुपारी बारा वाजता सुर्यभिषेक करण्यात आला. यासाठी रुरकी आयआयटीच्या मदतीने खास प्रणाली तयार करण्यात आली. यासाठी रुरकी आयआयटीच्या शास्त्रज्ञांच्या चमूने गर्भगृहात अनेक आरसे आणि लेन्स लावले होते. सूर्यकिरणे एका आरशावर आदळल्यानंतर पितळी पाईपच्या साहाय्याने दुसऱ्या आरशाकडे गेली. यानंतर दुसऱ्या आरशावर आदळल्यानंतर तो तिसऱ्या आरशाकडे गेला. आणि आरशावर आदळल्यानंतर सूर्याची किरणे थेट पाईपच्या तोंडातून बाहेर पडली आणि राममालाच्या कपाळावर पोहोचली. यानंतर पाच मिनिटे रामललाची सूर्य टिळक पूजा करण्यात आली.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments