Thursday, August 27, 2026
Homeसाताराविश्वरत्न  बोधीसत्व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ व्या जयंती महोत्सव फलटण...

विश्वरत्न  बोधीसत्व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ व्या जयंती महोत्सव फलटण मध्ये उत्साहात साजरा

फलटण : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त फलटण शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दि १४ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची व विचारांची भव्य शोभा यात्रा शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात येणार असल्याचे जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष योगेश अहिवळे यांनी सांगितले .

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्यावतीने प्रतिवर्षी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. गुरुवार दि ११ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती व फलटण मेडिकल फौडेशन तसेच लायन्स क्लब संचलित ब्लड बँक फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती व महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबीर डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मंगळवार पेठ येथे आयोजित करण्यात आले होते . लायन्स क्लब फलटण लायन्स मुधोजी चॅरिटेबल आय हॉस्पीटल व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती याच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतिबा फुले जयंती महोत्सव व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मोफत नेत्र तपासणी शिबीर व गरीब रुग्णांना मोफत व सर्वसामान्य रुग्णांना अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे

शनिवार दि १३ एप्रिल २०२४ रोजी रात्री १२ वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे फटाक्याच्या आतिषबाजीत करण्यात आली त्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले व वंदना घेण्यात आली अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले  . रविवार दि १४ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ८ वाजता फलटण जिंती नाका येथे भीम ज्योतीचे स्वागत करण्यात आले . सायंकाळी ७ वाजता पंचशील चौक , मंगळवार पेठ , फलटण येथून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमा व विचारांची भव्य मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून पारंपारिक वाद्य सह काढण्यात आली  शोभा यात्रेत विविध चित्ररथामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध यांच्या आकर्षक प्रतीकृती व देखावे केल्यामुळे नागरिकांनी मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी केली होती. शोभायात्रेचा शुभारंभ माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व युवा नेते श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला.

महाराष्ट्र खो – खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, समशेरसिंह नाईक निंबाळकर, उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल धस, तहसीलदार अभिजित जाधव, पोलीस निरीक्षक शहा, पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, यांच्यासह अनेक मान्यवरांनी तसेच विविध सामाजिक संघटनांनी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालुन अभिवादन केले. फलटण शहर व तालुक्यातील विविध सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था वगैरे ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले.

पंचशील रिक्षा ऑटो संघटनेच्या वतीने विठ्ठल मंदिर येथे रक्तदान शिबिर व अन्नदानाचा कार्यक्रम संपन्न झाला. भीम नगर, मंगळवार पेठ फलटण येथील मित्र मंडळानेही अन्नदान व अभिवादन कार्यक्रमाच्या आयोजन केले होते. सोमवार पेठ फलटण, येथेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवा निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस. टी.) फलटण आगार व कामगार संघटना तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा ऑटो संघटनेच्यावतीने बसस्थानकावर मान्यवरांचे हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकी दरम्यान क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्सव मंडळाच्या वतीने पाणी वाटप करण्यात आले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्यावतीने पोलीस प्रशासन, ट्रक्टर चालक, झांजपथक, लाईट डेकोरेशन, साउंड सिस्टिम व जयंती महोत्सवास ज्यांची मदत झाली त्यासर्वांचे पुष्पगुच्छ देवून आभार मानण्यात आले. यावेळी पोलीस यांच्यासह विविध संस्थाचे पदाधिकारी, जयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments