Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रउत्तमराव जानकर यांची भूमिका नेमकी काय असणार याकडे आता माढा लोकसभा मतदारसंघाचे...

उत्तमराव जानकर यांची भूमिका नेमकी काय असणार याकडे आता माढा लोकसभा मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे.

अकलूज :माढा लोकसभा मतदारसंघात एकतर्फी वाटणारी लढत आता चुरशीची झाली आहे, माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या माध्यमातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिली गेली आहे तर मविआ मध्ये माढ्याची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मिळाली असल्याने त्यांच्या  उमेदवार ठरत नव्हता , परंतु आता मविआ कडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात भाजप पक्षातील अकलूज चे नाराज उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपची साथ सोडून , धैर्यशील मोहिते पाटील योनी तुतारी हातात घेतली आहे . यामुळे भाजप पक्षानी माढा लोकसभा मतदारसंघात लक्ष केंद्रित केले आहे .

माढा लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने उत्तमराव जानकर हे मोहिते पाटील यांना – साथ देणार असल्याबाबत त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर तातडीने ना. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट घेऊन ना. अमित शहा यांची सुद्धा भेटते घेणार आहेत. या भेटीनंतर उत्तमराव जानकर यांची भूमिका नेमकी काय असणार याकडे आता माढा लोकसभा मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील नेते उत्तमराव जानकर हे आज सकाळी बारामती विमानतळावरून विशेष विमानाने उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. ना. देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री ना. अमित शहा यांचे सुद्धा जानकर भेट घेणार आहेत.

सोलापूर जिल्ह्याचे नेते उत्तमराव जानकर यांच्या समवेत माढा लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार शहाजीबापू पाटील, जयकुमार गोरे हे सुद्धा आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments