Thursday, August 13, 2026
Homeसाताराश्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटण YC हायस्कूल एसटी स्टँड शेजारी फलटण येथे मानवी...

श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटण YC हायस्कूल एसटी स्टँड शेजारी फलटण येथे मानवी साखळी द्वारे मतदान जनजागृतीचे आयोजन करण्यात आले होते

फलटण – भारत निवडणूक आयोगा मार्फत sveep अंतर्गत मतदारा मध्ये मतदाना बाबत जनजागृती साठी व मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध उपक्रम द्वारे काम सुरु आहे

43 माढा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 255 फलटण (अ.जा) विधानसभा मतदार संघा मध्ये मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृतीसाठी फलटण येथे 13 एप्रिल रोजी सकाळी 7.00 वाजता श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटण YC हायस्कूल एसटी स्टँड शेजारी फलटण येथे मानवी साखळी द्वारे मतदान जनजागृतीचे आयोजन करण्यात आले होते

मा जितेंद्र डुडी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा अधिकारी सातारा व मोनिका सिंह जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हा अधिकारी सोलापूर व याशनी नागराजन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा, मा सचिन ढोले सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व तहसीलदार फलटण डॉ अभिजीत जाधव याच्या मार्गदर्शन खाली काम सुरु आहे

यावेळी अप्पर तहसीलदार मयूर राऊत यांनी भारत निवडणूक आयोगा मार्फत विविध उपक्रम व विविध स्तरावर मतदारा मध्ये मतदान बाबत जनजागृती स्विफ्ट अंतर्गत सुरू आहे त्याचा त्याचाच भाग म्हणून भारताच्या नकाशामध्ये फलटण 100 टक्के मतदान मानवी साखळी द्वारे जनजागृती आयोजन केलं असल्याचे सांगून नवं मतदार यांनी पुढे येऊन मतदान करण्याचे अहवान केले तसेच प्रत्येक मतदार यांनी किमान 10 मतदारांना मतदान करणे बाबत जनजागृती करण्यात यावी असे आवाहन करत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदान जनजागृती उपक्रम स्वीप द्वारे करत असल्याचे यावेळी मयूर राऊत यांनी सांगितले

यावेळी मुख्य अधिकारी नगर परिषद फलटण निखील मोरे, गट विकास अधिकारी फलटण चंद्रकांत बोडरे, यांनी मनोगत व्यक्त केले मतदार जनजागृती चित्रकला चित्रे, हॅन्ड वेल, पथनाट्य, झांजपथक, स्काऊट गाईड, एनसीसी गाईड, अशा विविध कार्यक्रमाद्वारे मतदान जनजागृती चे उपक्रम घेण्यात आला

कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वीप सहायक अधिकारी सचिन जाधव यांनी केले

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments