Raj Thackeray Speech: शिवसेनेचं प्रमुखपद ते भाजपकडून ‘कमळ’चा प्रस्ताव, राज ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

0
24
Raj Thackeray Speech: शिवसेनेचं प्रमुखपद ते भाजपकडून ‘कमळ’चा प्रस्ताव, राज ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे


शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रमुखपद राज ठाकरे स्वीकार असल्याच्या चर्चेवर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले की, जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडलो तेव्हा माझ्या घरी ३२ आमदार आणि ६ ते ७  खासदार जमले होते. आपण एकत्र बाहेर पडू, असे ते म्हणत होते. मात्र, त्यानंतर मी महाराष्ट्र दौरा सुरु केला. अनेकांना वाटलं मी काँग्रेसमध्ये जाईन. पण मी तेव्हाच स्पष्ट केलं होतं की, मला पक्ष फोडून कुठली गोष्ट करायची नाही. माझ्या मनात असा कोणताही विचार नाही. पण जर मी पक्षातून बाहेर पडलो तरी मी स्वत:चा पक्ष काढेन. पण मी कोणाच्या हाताखाली काम करणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय मी कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही, हे मी तेव्हाच ठरवले होते. तरीही मी त्यावेळी एकाला संधी दिली होती. पण त्याला समजलंच नाही, असा टोलाही राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. तसेच आता कोणत्याही पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारणार नसल्याचे त्यांनी म्हटले. 



Source link