Thursday, August 27, 2026
Homeक्रीडाSRH vs CSK : हैदराबदचा चेन्नईवर 6 गडी राखून विजय | पुढारी

SRH vs CSK : हैदराबदचा चेन्नईवर 6 गडी राखून विजय | पुढारी

SRH vs CSK : हैदराबदचा चेन्नईवर 6 गडी राखून विजय | पुढारी

[ad_1]

हैदराबाद; वृत्तसंस्था : सलामीवीर अभिषेक शर्माने 12 चेंडूंत 37 धावांची खेळी करीत सनरायझर्स हैदराबादवर विजयाचा अभिषेक केला. अभिषेकने 4 षटकार आणि 3 चौकार ठोकले. त्याने रचलेल्या पायावर सनरायझर्स हैदराबादच्या ट्रॅव्हिस हेड (31), एडन मार्कराम (50) यांनी विजयाचा कळस चढवला. त्यांनी चेन्नई सुपर किंग्जला 6 विकेटस्नी हरवले. प्रथम फलंदाजी करणार्‍या चेन्नईने 5 बाद 165 धावा केल्या. त्या हैदराबादने 18.1 षटकांत मागे टाकल्या. (SRH vs CSK)

चेन्नईने दिलेल्या 166 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादकडून सलामीवीर अभिषेक शर्माने स्फोटक खेळी केली. त्याने पहिल्या षटकापासून रुद्रावतार दाखवत पाहुण्या चेन्नईची डोकेदुखी वाढवली. अभिषेकने 4 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 12 चेंडूंत 37 धावा कुटल्या. चेन्नईचा इम्पॅक्ट प्लेअर मुकेश चौधरीच्या एकाच षटकात त्याने 27 धावा चोपल्या.

घातक वाटणार्‍या अभिषेकला बाद करण्यात दीपक चाहरला यश आले. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या अभिषेकचा झेल रवींद्र जडेजाने टिपला. हैदराबादला डावाच्या 46 धावांवर पहिला झटका बसला. यातील 37 धावा एकट्या अभिषेकच्या होत्या. अभिषेकनंतर ट्रॅव्हिस हेड आणि एडन मार्कराम यांची जोडी जमली. त्यांनी डावाला चांगला आकार दिला. त्यामुळे आवश्यक धावगती कधी जास्त वाटली नाही. हेड 31 धावांवर बाद झाला. त्यानंतर मार्करामने आपले अर्धशतक 35 चेंडूंत गाठले; पण त्याच धावांवर तो बाद झाला. मोईन अलीने त्याला पायचित केले. यावेळी हैदराबादला 36 चेंडूंत 34 धावा हव्या होत्या.

मैदानात शाहबाज अहमद आणि हेन्रिक क्लासेन ही जोडी होती. रचिन रवींद्रने आपल्या षटकात 3 धावा दिल्या. पुढच्या षटकात मोईन अलीला शाहबाजने उत्तुंग षटकार ठोकला; पण पुढच्या चेंडूवर तो पायचित झाला. हैदराबादला विजयासाठी हव्या होत्या 26 चेंडूंत 25 धावा.

विजयाचे सोपस्कार क्लासेनने नितीशकुमार रेड्डीच्या मदतीने 11 चेंडू शिल्लक ठेवून पूर्ण केले. रेड्डीने दीपक चाहरला विजयी षटकार ठोकला. क्लासेन 10, तर रेड्डी 14 धावांवर नाबाद राहिले.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना चेन्नईच्या संघाने निर्धारित 20 षटकांत 5 बाद 165 धावा केल्या. चेन्नईकडून शिवम दुबेने सर्वाधिक धावा केल्या, त्याने 4 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 24 चेंडूंत 45 धावा कुटल्या, तर रचिन रवींद्र (12), ऋतुराज गायकवाड (26), अजिंक्य रहाणे (35) आणि डेरिल मिचेल (13) धावा करून बाद झाले. रवींद्र जडेजा (31) आणि महेंद्रसिंग धोनी (1) धावा करून नाबाद परतले. यजमान हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार, पॅट कमिन्स, शाहबाज अहमद, टी. नटराजन आणि जयदेव उनाडकट यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments