Saturday, October 3, 2026
Homeदेश-विदेशIsrael strike on Iran Embassy in Syria | इस्रायलने सीरियातील इराणच्या दूतावासावर...

Israel strike on Iran Embassy in Syria | इस्रायलने सीरियातील इराणच्या दूतावासावर केला हवाई हल्ला,किमान 8 जणांचा मृत्यू! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

इस्रायलने सीरियातील इराणच्या दूतावासावर केला हवाई हल्ला,किमान 8 जणांचा मृत्यू!

दूतावासाच्या इमारतीवर झालेल्या हल्ल्यात किमान 8 जणांचा मृत्यू झाला आहे. मारल्या गेलेल्यांमध्ये इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्सच्या वरिष्ठ कमांडरचाही समावेश आहे.

एकीकीडे इस्रायल आणि हमास मधील संघर्ष (Israel Hamas War) अद्यापही थांबलेला नाही. 7 ऑक्टोबर 2023 पासून सुरू झालेल्या या युद्धात आतापर्यंत हजारो नागरिकांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे आता इस्रायलने सीरियाच्या राजधानीत असलेल्या इराणच्या दूतावासावर हल्ला केला. या हल्ल्यात (Israel strike on Iran Embassy in Syria) किमान 8 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतकांमध्ये इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्सच्या वरिष्ठ कमांडर रझा जाहेदी यांचाही समावेश आहे. मात्र, इस्रायलने या हल्ल्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. इस्रायली सैन्याने इराणच्या दूतावासाच्या कॉन्सुलर विभागावर स्टेल्थ एफ-35 लढाऊ विमानातून सहा क्षेपणास्त्रे डागली ज्यात जाहिदीचा मृत्यू झाला.

हे सुद्धा वाचा

सीरियाच्या अधिकृत वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलने इराणच्या वाणिज्य दूतावासाच्या इमारतीला लक्ष्य करून हा हल्ला केला. राजधानी दमास्कसच्या शेजारील माझेह येथे असलेल्या इराणच्या दूतावासावर हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात राजधानीतील अत्यंत समृद्ध क्षेत्र असलेल्या अल-माझेह येथील इराणी दूतावासाला लागून असलेली ॲनेक्स इमारत पूर्णपणे जमीनदोस्त झाली. इराणचा कमांडर मोहम्मद रजा झहेदी हा इस्रायलच्या हल्ल्यात ठार झाला.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments