Vijay Shivtare : विजय शिवतारेंची यू टर्न; लोकसभा निवडणुकीतून घेतली माघार, अजित पवारांना दिलासा

0
127
Vijay Shivtare : विजय शिवतारेंची यू टर्न; लोकसभा निवडणुकीतून घेतली माघार, अजित पवारांना दिलासा


Vijay Shivtare : बारामती लोकसभा मतदार संघात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. अजित पवार यांचे कट्टर विरोधक विजय शिवतारे यांनी बारामती मतदार संघातून निवडणूक लढवण्याचा निर्धार केला होता. त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका देखील केली होती. मात्र, आता त्यांनी त्यांच्या भूमिकेवरून यू टर्न घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत झालेल्या बैठकीनंतर आज शिवतारे यांनी त्यांची तलवार म्यान करत बारामती लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले सासवड येथे पत्रकार परिषदेत त्यांनी माध्यमांसमोर त्यांची भूमिका स्पष्ट केली.



Source link