Wednesday, September 30, 2026
Homeदेश-विदेशRameshwaram Cafe blast case | एनआयएनं रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटातील दोन संशयितांचे फोटो...

Rameshwaram Cafe blast case | एनआयएनं रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटातील दोन संशयितांचे फोटो केले प्रसिद्ध, 10 लाखांचे बक्षीस जाहीर! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

एनआयएनं रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटातील दोन संशयितांचे फोटो केले प्रसिद्ध, 10 लाखांचे बक्षीस जाहीर!

एनआयएने बक्षीस जाहीर करण्यासोबतच दोन्ही संशयितांची छायाचित्रेही प्रसिद्ध केली आहेत.

बंगळुरूमधील रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटाचा (Rameshwaram Cafe blast case) तपास करणाऱ्या एनआयएने दोन संशयितांची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. या दोघांचाही या स्फोटात हात असल्याचा संशय आहे. एनआयएने दोन्ही संशयितांवर प्रत्येकी 10 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले आहे. अब्दुल मतीन अहमद ताहा आणि मुसविर हुसेन शाजिब अशी या दोन प्रमुख संशयितांची नावे आहेत. बेंगळुरूच्या कुंडलहल्ली येथील रामेश्वरम कॅफेमध्ये 1 मार्च रोजी झालेल्या स्फोटात हे दोघेही सहभागी असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

एनआयएने बक्षीस जाहीर करण्यासोबतच दोन्ही संशयितांची छायाचित्रेही प्रसिद्ध केली आहेत. एजन्सीने सांगितले की, लोकांना संशयितांची ओळख पटवण्यासाठी फोटो जारी करण्यात आले आहेत. हे लोक आपला चेहरा किंवा पोशाख बदलून कुठेतरी जाऊ शकतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला त्याच्यासारखीच कोणतीही व्यक्ती किंवा असा कोणताही संशयित दिसला तर, विलंब न करता एनआयएने दिलेल्या नंबरवर संपर्क साधा किंवा कळवा.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments