Wednesday, September 30, 2026
Homeदेश-विदेशBJP candidate Kangana Ranaut | कंगनाचा मतदारसंघात रोड शो; म्हणाली, 'मला स्टार...

BJP candidate Kangana Ranaut | कंगनाचा मतदारसंघात रोड शो; म्हणाली, ‘मला स्टार समजू नका” | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

कंगनाचा मतदारसंघात रोड शो; म्हणाली, ‘मला स्टार समजू नका”

हिमाचल प्रदेशामधील मंडी या लोकसभा मतदार संघातून अभिनेत्री कंगना रणौत ही भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणार आहे. नुकताच तिने आपल्या मतदारसंघात रोड शो केला.

मंडी: लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागल्यामुळे भाजप जोरदार प्रचार करत आहेत. हिमाचल प्रदेशामधील मंडी या लोकसभा मतदार संघातून अभिनेत्री कंगना रणौत ही भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणार आहे. नुकताच तिने आपल्या मतदारसंघात रोड शो केला. यावेळी जनतेशी संवाद साधताना तिने विरोधकांवरही जोरदार निशाणा साधला. “मंडीतील लोकांना या गोष्टीचा अभिमान आहे की त्यांची मुलगी आणि बहीण आता निवडणुकीच्या रिंगणात उभी आहे. विकास हाच भाजपचा मुद्दा आहे आणि मंडीमधील लोक हे दाखवून देतील की त्यांच्या मनात काय आहे”, असे आवाहन कंगना राणौत हिने केले.

कंगना राणौत हिने राजकारणात एन्ट्री केल्यानंतर काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी कंगनाविषयी जी वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. याबद्दल देखील कंगनाने रोड शोमध्ये चोख उत्तर दिले. रोड शो दरम्यान कंगना म्हणाले, “जे लोक तुमच्या मुलीची किंमत ठरवतात, ते कधीच तुमचे होऊ शकत नाहीत. जे प्रभू श्रीराम यांचे होऊ शकत नाहीत, ते तुमचे कधीच होऊ शकत नाही”, अशा शब्दांत तिने टोला लगावला. मंडी काय आहे, हे इथले लोकच सांगतील. मतदान करताना लोक काँग्रेसला चोख उत्तर देतील, असे कंगना या रोड शोदरम्यान म्हणाली.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments